ताज्या बातम्यापुसदमहाराष्ट्रयवतमाळविशेषसन्मान सत्कारसामाजिक

पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते राजेश ढोले यांना धम्मभूषण पुरस्कार जाहीर!

✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

“34 वी धम्म परिषद वटफळी तालुका नेर जिल्हा यवतमाळ येथे होणार सन्मानित.

पुसद :- रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीचे विदर्भ उपसंपादक,तथा दैनिक सुवर्ण महाराष्ट्र पुसद तालुका प्रतिनिधी तसेच सामाजिक सांस्कृतिक,अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे पुसद तालुक्यातील लक्ष्मी नगर बोरगडी निवांसी उपासक राजेश ढोले यांना महाबोधी बहुउद्देशीय संस्था अमरावती शाखा वटफळी यांच्या वतीने धम्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की भगवान गौतम बुद्धाचा विश्व कल्याणकारी मार्ग स्वीकारून आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील समता मय भारत उभा करण्यासाठी सतत धडपडत आहात व मार्गक्रमण करीत आहात सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात आपले कार्य उल्लेखनी असून पुढील पिढीला सकारात्मक दिशा देणार आहात आपल्या कार्याचा समाजाला व आम्हाला अभिमान आहे.

आपल्या या स्तुत्य उल्लेखनीय कार्याचे कौतुक म्हणून पुढील जीवनात आपल्या विविध क्षेत्रात ऊर्जेचे बळ मिळावे याकरिता महाबोधी बहुउद्देशीय संस्था शाखा वटपळी तालुका नेर जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी वटफळी येथे होणाऱ्या 34व्या धम्म परिषदेमध्ये आपणास या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भदंत धम्मसेवकजी महाथेंरो मुळावा,तसेच महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री मा. संजय शिरसाट, देश विदेशातील भिक्खूं व भिक्खूंनी संघ इत्यादींची उपस्थिती राहणार आहे अशी माहिती 34 व्या धम्म परिषदेचे आयोजक यांनी कळविले आहे.

धम्मभूषण पुरस्कार मिळाल्याने पुसद तालुक्यातील धम्मबांधव तथा तथा मित्र परिवार सामाजिक क्षेत्रातील विविध मंडळी सदर पुरस्कार मिळाल्याने आनंद व्यक्त करीत आहे व सर्व स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!