संत शिरोमणी रोहीदास महाराजांची ६४९ वी जयंती उमरखेडमध्ये उत्साहात साजरी
✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड :- येथील बस स्थानक परिसरात संत शिरोमणी कवि रोहीदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांची ६४९ वी जयंती मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरी करण्यात आली.

दरवर्षी माघ पौर्णिमेला साजरी होणारी ही जयंती संत रोहीदास महाराजांच्या समानता, भक्ती, मानवता व सामाजिक न्यायाच्या विचारांचे स्मरण करून देणारी आहे.रविवार, १ फेब्रुवारी रोजी झालेल्या या कार्यक्रमात दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचे सचिव लक्ष्मीकांत नंदनवार यांच्या हस्ते संत रविदास महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी संत रोहीदास महाराजांच्या कार्याचा आणि त्यांच्या समाजप्रबोधनात्मक विचारांचा गौरव करण्यात आला.
समाजात समता, बंधुता आणि एकोप्याचा संदेश देणारे संत रविदास महाराजांचे विचार आजच्या काळात अधिकच प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.या प्रसंगी नारायण इटकरे, गजानन सुरोशे, प्रसाद सुरोशे, शशिकांत इटकरे, गोपाल देशमाने, ओंकार ढगे, आनंद इटकरे, रवींद्र चव्हाण, गजानन माने, बाळराज काळबांडे, जयवंतराव सूर्यवंशी, रवींद्र वानरे, अझरउल्ला खान, शैलेश ताजवे, शंकर ढगे, ओंकार सुरोशे यांच्यासह समाजबांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम शांततामय वातावरणात पार पडला. उपस्थितांनी संत रोहीदास महाराजांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करत समाजात समानता व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा निर्धार व्यक्त केला.
