ताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

एमपीजे च्या “सन्मानाने जगण्याचा अधिकार राष्ट्रीय अधिवेशनात मान्यवरांची हजेरी

✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक)

उमरखेड :- जीवन म्हणजे केवळ भौतिक अस्तित्व नाही तर सन्मानाने आणि आदराने जगण्याचा संविधानाने दिलेला अधिकार आहे .परंतु आजही नागरीक सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक असमानतेमध्ये, प्रत्यक्षात लाखो नागरीक त्यांच्या मूलभूत अधिकार आणि सन्माननीय जीवना पासून वंचित आहेत. “जीवनाचा अधिकार” आणि “प्रतिष्ठा”या संकल्पनां बद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे ,उपेक्षित लोकांचा आवाज मुख्य प्रवाहात आणणे, सार्वजनिक सहभागाद्वारे संवैधानिक मूल्ये मजबूत करणे.

या उद्देशाने मुव्हमेन्ट फॉर पीस ॲन्ड जस्टीस फॉर वेलफेअर ( एमपीजे ) या चळवळीने “सन्मानाने जगण्याचा अधिकार” हे राज्य स्तरिय अभियान राबविण्यात आले.या अंतर्गत जनजागृती साठी पोस्टर्स आणि सोशल मीडिया ,संवाद आणि चर्चासत्र सह जिल्हास्तरीय जनसभे द्वारे जन जागृती करण्यात आली.

या अभियान चा समारोप 1 फेब्रवारी रोजी सकाळी 10 ते 2 वाजे पर्यंत तपाडिया नाट्यमंदिर , छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) येथे राष्ट्रीय अधिवेशनाने होणार आहे. ॲड. प्रशांत भुषण ,अनुपम अध्यक्ष,युवा हल्ला बोल, ॲड. अभय टाकसाळ, सामानिक कार्यकर्ता, सआदतुल्ला हुसैनी अध्यक्ष, जमात-ए-इस्लामी हिंद, वासिक नदीम खान सचिव, एपीसीआर, जमीर कादरी संयोजक एमपीजे महाराष्ट्र हजेरी लावणार आहेत.

यात सामाजिक संघटना , समाज सेवक, संविधान प्रेमी , राजकीय कार्यकर्ते , नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष फिरोज अन्सारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!