www.google.comउमरखेड तालुक्यातीलक्राइम गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

विडुळ येथील मोक्षधाम विकासकामात लाखो रुपयांच्या निधीचा अपहार करणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी गुन्हे दाखल करा!

🔥(पंचायत समिती बीडिओ यांच्याकडे उमरखेड प्रेस क्लब ची लेखी तक्रार सादर)

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक)

उमरखेड – तालुक्यातील विडूळ येथील मोक्षधाम मध्ये जनसुविधा योजनेअंतर्गत 8 लाख रुपयाचा सिमेंटचा रस्ता आणि 7 लाख रुपयांचा प्रतीक्षालय उभारण्यात आले आहे. पण हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून दोन महिन्यातच रस्ता पूर्णपणे रखडला गेला आहे,कामात विनापरवाना मातीमिश्रित रेती वापरण्यात आली असून कोणतेही क्युरिंग न करता काम लवकर पूर्ण करून बिले काढण्यात आली.

दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी काम पूर्ण झाल्याचे लावलेल्या फलकावर दिसून येत आहे. सदर कामात मोठ्या प्रमाणात अफरातफरी झाली असून सदर कामाची गुणनियंत्रण विभागाकडून चौकशी करून शासनाची दिशाभूल करणाऱ्या संबंधित ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कायदेशीर व दंडात्मक कारवाई करून अफरातफर केलेल्या लाखो रुपयाच्या निधीची रक्कम वसूल करण्यात यावी. तसेच संबंधित ठेकेदार यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावे. सदर कारवाई ८ दिवसाच्या आत न झाल्यास कोड पंचायत समिती पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. करिता लेखी तक्रार सादर..!

यावेळी तक्रारकर्ते शाम धुळे,गजानन वानखेडे, सिध्दार्थ दिवेकर,अशोक धुळे,प्रसेनजीत दिवेकर, बबलू भालेराव इत्यादी उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!