ताज्या बातम्यापुसदमहाराष्ट्रयवतमाळशैक्षणिकसामाजिक

पुसद तालुक्यातील मांडवा येथे श्रमदानातून राबवली स्वच्छता मोहिम

🔥 (मांडवा येथील ग्रामस्थ एकवटले श्रमदानासाठी)

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

पुसद – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान पुसद तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीत राबविल्या जात आहे. त्यापैकी हे अभियान मांडवा ग्रामपंचायत येथे दि. 17 सप्टेंबर 2025 सुरु असून या अभियानामध्ये गावाच्या विकासाचे विविध उपक्रम राबविल्या जात आहेत. दि. 17 जानेवारी 2026 रोजी नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत मार्फत शनिवारी श्रमदान करण्याचे नियोजन करण्यात आले.

यावेळी होऊ देरे डंका घेऊ नको रे शंका सुदराया लागलं सार गाव हे गित वाहन चालक अनिल शिंदे, शंकर पुरी,एस. व्ही. खंदारे यांनी गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले.

पंचायत समिती पुसद येथील गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड यांच्या नेतृत्वात सर्व विभागाचे कर्मचारी व अधिकारी तसेच सर्व विस्तार अधिकारी विलास पिंपळे, संतोष डाखोरे,ए. आर. शेख, तसेच पंचायत समितीचे सर्व महिला, पुरुष ग्रामपंचायत अधिकारी, व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन D N E 136 चे जिल्हा कार्याध्यक्ष तुकाराम राठोड,

तालुकाध्यक्ष संजय हिंगाडे, अश्विन तांबडे, उमेद तालुका व्यवस्थापक गौरवकुमार कांबळे,सरपंच अल्का ढोले, उपसरपंच विजय राठोड, सचिव एस. टी. तडसे, पो. पा. दत्तराव पुलाते, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, सोसायटीचे अध्यक्ष वसंत आडे,

शाळेचे सर्व शिक्षक वृंद,सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तथा कर्मचारी,गावातील सर्व समित्यांचे पदाधिकारी मंडळी,बचत गटातील महिला सर्व अंगणवाडी शिक्षिका,आशा वर्कर,शाळेतील मुले, यांनी स्वच्छता अभियानामध्ये 350 ग्रामस्थानी सहभाग घेऊन गावात मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्यात आली.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!