उमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळशहरसन्मान सत्कारसामाजिक

सम्यक बुद्ध विहार येथे मराठवाडा नामविस्तार दिना निमित्ताने हळदी कुंकाचा कार्यक्रम

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466


उमरखेड – सम्यक बुद्ध विहार येथे मराठवाडा नामविस्तार दिनानिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केले होते. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ तेजश्री संतोष जैन नगराध्यक्ष, नगरसेविका सौ.वैष्णवी लाहेवार, माजी नगरसेविका सौ.रूपाली रासकर, गजानन रासकर इत्यादी पाहुणे मंडळी उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे आयोजन रमामाता महिला मंडळाकडून करण्यात आले होते अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महिलांची संगीत खुर्ची या स्पर्धेचे सुद्धा आयोजित करण्यात आले होते.

संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये गट A मधून प्रथम सौ. ज्योतीताई अनिल हटकर तर सौ. स्वाती सिध्दार्थ दिवेकर ह्याचा द्वितीय क्रमांक आला. तसेच गट B मधून सौ मायाबाई सुनील पाईकराव तर गट B मधून सौ.मिथुन कदम ह्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिन आणि हळदीकुंक हा कार्यक्रम उत्साह यशस्वीरित्या संपन्न झाला. यावेळी वार्डातील सर्व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होतात.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!