दारव्हा येथे मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनची दारव्हा शहर व तालुका कार्यकारीनी गठीत
✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466
दारव्हा – मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांच्या आदेशानुसार तसेच यवतमाळ जिल्हाध्यक्ष युनूस शेख व तालुका अध्यक्ष जर्रार कुरेशी यांच्या पुढाकाराने दारव्हा येथे मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनची दारव्हा शहर व तालुका कार्यकारीनी गठीत करण्यात आली.

यावेळी शहर अध्यक्षपदी वासिम शाह अजीम शाह यांची नियुक्ती करण्यात आली, तसेच दारव्हा शहर उपाध्यक्ष शेख जुनेद शेख शागीर, दारव्हा तालुका उपाध्यक्ष मोहम्मद नासिब मोहम्मद अय्युब, अब्दुल शकील अब्दुल खालील,व सकीब रहेबर साजिद खान तसेच तालुका सचिव मोहम्मद निसार मोहम्मद अय्युब, युवा तालुकाध्यक्ष मो अहमर राहील मो तेहजीब यांची सदस्य पदी निवड करण्यात आली व नियुक्तीपत्र देण्यात आले. यासर्वांचं संघटनेत स्वागत केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, समाजाच्या सर्व घटकांना घेऊन संस्थेचे कार्य पार पाडायचे असल्याचं युनूस शेख यांनी सांगितले तसेच राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांच्या कार्याची माहिती उपस्थित असलेल्या सर्वांना दिली.

यवतमाळ जिल्ह्यात मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन आपले कार्य सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार यावेळी केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद आसिफ ठेकेदार उपस्थित होते.
