आरोग्यउमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळशहरसामाजिक

उमरखेड पोलीस स्टेशन l येथे महा रक्तदान शिबिर संपन्न

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक)

उमरखेड :- (दिनांक 13जानेवारी) दि. 12 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ साहेब तसेच स्वामी विवेकानंद जयंती दिन आणि पोलीस रेझिंग डे निमित्त पोलीस स्टेशन उमरखेड येथे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे मार्गदर्शनाखाली भव्य महा रक्तदान शिबिर संपन्न झाले.

अहोरात्र जनतेची सेवा करीत असणाऱ्या पोलीस बांधवांच्या पोलीस रेझिंग डे निमित्त सततच उमरखेड येथील प्रत्येक परिस्थिती मग श्री गणपती विसर्जन असो किंवा श्री दुर्गा माता विसर्जन असो ईद-ए-मिलाद असो इत्यादी सर्व सामाजिक सण शांततेत सुव्यवस्थेत पार पाडण्याकरिता समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन सामंजस्याने पार पाडण्याचे कार्य पोलीस अधीक्षक कुमार चिंता, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली उमरखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार शंकर पांचाळ हे आपल्या अधिनस्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सहकार्याने सतत करीत असतात.

प्रत्येक समाज व त्या त्या समाजातील घटक एकरूप व्हावा शांततेने जीवन व्यतीत करून सामाजिक सलोखा साधता यावा.

या उद्देशाने आज पोलीस स्टेशन उमरखेड येथे भव्य महा रक्तदान शिबिर आयोजित केले.

जिजाऊ ब्लड बँक नांदेड यांनी रक्त संकलन करण्याचे काम केले

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!