कृषी धनताज्या बातम्यामहाराष्ट्रमानवतसन्मान सत्कारसामाजिक

एलोरा नॅचरल सिड्स प्रा. लि. कंपनीच्या वतीने प्रगतशील शेतकरी भीमराव अमृतराव काळे यांचा सन्मान


✍🏻प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी)


मानवत :- प्रगतशील शेतकरी भीमराव काळे यांचा एलोरा नॅचरल सिड्स प्रा. लि. कंपनीकडून कंपनी मार्फत स्मुर्ती चिन्ह व रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. सावळी येथील प्रगतशील शेतकरी भिमराव अमृतराव काळे यांनी आपल्या शेतातील कांदा बियाणाची उत्तम गुणवत्ता दिल्या बद्दल व कमी क्षेत्रात भरघोष उत्पन्न घेतल्या बद्दल त्यांना एलोरा नॅचरल सिड्स. प्रा. लि. कंपनीच्या वतीने सन्मान शेतकऱ्याचा उपक्रमा अंतर्गत भीमराव अमृतराव काळे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी एलोरा नॅचरल सिड्स. प्रा. लि. कंपनीचे उत्पादन अधिकारी नारायण खेत्रे, टीम लीडर कुंदन थोरे, कर्मचारी लक्ष्मीकांत शिंदे पाटील यांच्या सह सरपंच माणिकराव काळे, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सिद्धेश्वर काळे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब ( काका ) काळे, माधव ( काका ) काळे, दत्तराव काळे, लक्ष्मण काळे, विष्णू काळे, प्रकाश ( नाना ) काळे, यांच्या सह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!