अपराधताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळशहर

भिम टायगर सेनेचे शहरअध्यक्ष सिध्दार्थ दिवेकर यांना जातीय भावनेतून बदनामी करण्याचे दैनिक पत्रकारांचे षडयंत्र

✍️बबलू भालेराव (मुख्य संपादक)

(सिध्दार्थ दिवेकर यांची लेखी तक्रार ठाणेदार पांचाळ यांच्याकडे सादर)

उमरखेड (दिनांक 26 मे) माझी जातीय भावनेतून बदनामी करणाऱ्या स्वतःला अधिकृत समजणारे पत्रकारावर कारवाई करा अशी लेखी तक्रार सिध्दार्थ दिवेकर यांनी उमरखेड पोलीस स्टेशनला केली आहे.

दैनिक प्रतिनिधी यांनी माझेवर उमरखेड पोलीस स्टेशनला खोटी तक्रार देऊन माझी बदनामी केली. अनुसूचित जाती मधील बौद्ध आहे, अधिकृत पा. उमरखेड वार्ता वृत्तपत्र मध्ये यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी तसेच महाराष्ट्र वायरल न्यूज चैनल सहसंपादक, जनहित 24 न्यूज चॅनल कार्यकारी संपादक म्हणून पत्रकार क्षेत्रात काम करतो.तसेच भीम टायगर सेना या सामाजिक संघटनेमध्ये मागील पंधरा वर्षांपासून शहराध्यक्ष म्हणून या पदावर काम करतो तसेच पत्रकारिता क्षेत्रांमध्ये मागील पाच ते सहा वर्षापासून काम करतो.

दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी नामांकित गो. सी.गावंडे महाविद्यालयाकडून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये पत्रकार यांचा सत्कार म्हणून भारतीय संविधान देण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला मी ही उपस्थित होतो, मलाही भारतीय संविधान सप्रेम भेट देण्यात आले होते. मी घरी आल्यावर भारतीय संविधान प्रत बघितल्यावर असे लक्षात आले की, या संविधान प्रत मध्ये संस्था अध्यक्ष राम देवसरकर आणि संस्था सचिव डॉ. या.मा राऊत यांचे छायाचित्र दिसून आल्याने ही संविधानाची तोडमोड विटंबना झाली. ही बाब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांच्या लक्षात आणून दिली.

दादासाहेब शेळके यांनी संस्था अध्यक्ष राम देवसरकर यांना कॉल करून सदर संविधान प्रत मध्ये मोडतोड व विटंबना झाली, ही बाब लक्षात आणून दिली त्यावर एक जाहीर माफीनामा आणि एक व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकून संविधान प्रेमी यांची माफी मागावी असे सांगण्यात आले होते.

पण पंधरा दिवस होऊनही कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया राम देवसरकर यांनी दिली नसल्यामुळे शामभाऊ धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष यवतमाळ) व कैलास कदम (तालुका अध्यक्ष) यांनी आमरण उपोषणाला बसल्यामुळे व या उपोषणाची दखल उमरखेड पोस्ट यांचे ठाणेदार शंकर पांचाळ साहेब यांनी घेतली व लेखी स्वरूपाची पत्र त्यामध्ये दोन व्यक्तीवर गुन्हा नोंद झाला असे लेखी पत्र देण्यात आले होते.

पण धक्कादायक बाब म्हणजे या विषयाला अनुसरून या अगोदर डॉ. आयुब पठाण यांनीही दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल केला होता. तेव्हा एकाही व माझ्या विरोधात अर्ज दिलेल्या पैकी व फोटोमधील व्यक्तींनी आपापल्या वृत्तपत्रकामध्ये बातमी लावली नाही व ते सर्व पत्रकार यांना लिखाण करण्याचे काम करतात. तो अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे असे असतांना मा. पांचाळ साहेब यांना निवेदन देताना फोटोमधील पिकीच्या पैकी पत्रकार तक्रार करणाऱ्यांपैकी यांनी आपापल्या वृत्तपत्रकामध्ये बातमी का येऊ नये याचा अर्थ काय निघतो.म्हणून मी सदर घटनेचा निषेध म्हणून बातम्या न आल्याबद्दल स्वतःला अधिकृत समजणारी पत्रकार यांना दलाल व विकाऊ अशा शब्द वापरा.

दलाल शब्द अधिकृत आहे याचा इंग्रजीमध्ये एजंट असा होतो. हा शब्द संविधानिक आहे. आणि विकाऊ म्हणजे पैसे घेणे. जर पैकीच्या पैकी व उपस्थितांच्या पत्रकाराच्या वृत्तपत्रकामध्ये बातमी येत नसेल याचा अर्थ काय घ्यायचा.म्हणून मी माझ्या मत म्हणून मी माझी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

परंतु संबंधित सर्व पत्रकार चिडून जाऊन कारण हे सर्व राम देवसरकर यांचे हस्तक आहेत. या अगोदर मला साहेबराव धात्रक शिक्षक पत्रकार यांनी मला 94225 80798 या मोबाईल क्रमांक वरून दुपारी तीनच्या दरम्यान कॉल आला होता.

धात्रक हे मला म्हणाले की, तुम्ही राजकीय दबाव टाकून गुन्हा नोंद केला आहे, तुम्ही लोकांना ब्लॅकमेल करता उपोषणाला बसता पैसे घेता असा आरोप त्यांनी माझ्यावर केला आहे.

जाणून बुजून मी अनुसूचित जाती आल्यामुळे माझी समाजात प्रतिष्ठा खराब व्हावी, माझं नाव खराब व माझी पत्रकारिता खराब व्हावी, माझं पोलीस रेकॉर्ड खराब व्हावं, या उद्देशाने सर्वांनी तक्रार दिली आहे.

तरी मा. साहेबांनी वरील व्यक्तींवर ॲट्रॉसिटी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात यावा.व संबंधित वरील पत्रकारांचे राम देवसरकर यांच्याशी काय? कनेक्शन आहे याची कॉल डिटेल्स ची तपासणी करावी,अन्यथा भिम टायगर सेनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल.

तक्रार देतीवेळी शामभाऊ धुळे जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना, कैलास कदम तालुका अध्यक्ष, संदीप विनकरे, जेष्ठ पत्रकार डॉ आयुब पठाण, पत्रकार बबलू भालेराव, पत्रकार राजेश खंदारे, प्रफुल दिवेकर शहराध्यक्ष आझाद समाज पार्टी, पत्रकार स्वरांजली गायकवाड, सिद्धोधन दिवेकर, राजू कांबळे इत्यादी अनेक संविधान प्रेमी व समाज बांधव उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!