उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळशैक्षणिक

शहीद भगतसिंग नगर परिषद शाळा NMMS परीक्षेच्या अनुषंगाने पालक सहविचार सभा

[मुख्याध्यापक आशिष राठोड आणि त्यांच्या भगिनी सौ. वंदना रमेश जाधव यांच्या वतीने वडील कै. लक्ष्मण राठोड यांच्या स्मृतीप्रत्यार्थ परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुस्तकाचा संच वाटप]

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड – शहीद भगतसिंग नगर परिषद शाळा क्र. 2 मध्ये दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी NMMS परीक्षेच्या अनुषंगाने पालक सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेत परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे पालक, शाळेचे मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षक–शिक्षिका उपस्थित होते.

सभेत परीक्षेच्या अनुषंगाने शाळेत राबविण्यात येणारे उपक्रम, तासिका याबाबत पालकांना माहिती देण्यात आली आणि पाल्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने मार्गदर्शन आणि चर्चा करण्यात आली.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आशिष राठोड आणि त्यांच्या भगिनी सौ. वंदना रमेश जाधव यांच्या वतीने वडील कै. लक्ष्मण राठोड यांच्या स्मृतीप्रत्यार्थ परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आवश्यक पुस्तकांच्या संचाचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांना आवश्यक पुस्तकांचा संच वाटप केल्यामुळे सर्व पालक पालिका यांनी मुख्याध्यापक राठोड सर यांचे आभार व धन्यवाद व्यक्त केले आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!