मानवत येथे बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्या खेळाडुंचा सन्मान व पारितोषिक वितरण

✒️ बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✒️ सिध्दार्थ दिवेकर (सहसंपादक)
✍🏻प्रविण घागरे (मानवत तालुका प्रतिनिधी) मो.8308755238
परभणी :- (दिनांक २३ डिसेंबर) बुद्धिबळ संघटने अंतर्गत खुल्या बुद्धिबळ स्पर्धा व मिनी चेस क्लब मानवत यांच्या तर्फे खुली बुद्धिबळ स्पर्धा मानवत येथील आई इंग्लिश स्कूल येथे २२ डिसेंबर वार रविवार रोजी घेण्यात आली.

बुद्धीबळ स्पर्धेत ५१ खेळाडूंनी नांदेड , परभणी, सेलु, मानवत, गंगाखेड, पाथरी आदी ठिकाणा हून उत्साही स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आई इंग्लिश स्कूलचे संचालक श्री.मुक्तीराम गोरे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.अभिलाषा ठाकुर व शाळेचे सर्व कर्मचारी यांनी काम बघितले तर ऑरब्युटर म्हणून नांदेडचे बुद्धिबळ प्रशिक्षक सिद्धार्थ हाटकर व मिनी चेस क्लब मानवतचे संचालक श्री. सारीपुत्त खरात यांनी बघितले स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करून ०९ ते ११ या वयोगटात विद्यार्थ्यांना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.


तसेच १४ वर्षे वयोगटातील विजेत्यांना रोख व पारितोषिके आणि मेडल देऊन विजेत्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.
