वडसा जिल्हा परिषद शाळेत महापुरुषांच्या प्रतिमेविनाच ध्वजारोहण

✒️ समाधान कांबळे (माहूर तालुका प्रतिनिधी)
श्रीक्षेत्र माहूर (दि.२८ जानेवारी) २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. जिल्ह्यातील तालुक्यातील गाव, खेड्यामध्ये सुद्धा यादिवशी शासनाचे परिपत्रक असूनसुद्धा काही ठिकाणी ते पाळल्या जात नाही.


तालुक्यातील वडसा जि.प.प्रा शाळेत महापुरुषांच्या प्रतिमेविनाच ध्वजारोहण उरकण्यात आले. त्यामुळे या प्रकाराला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शिक्षकच विध्यार्थ्यांना महापुरुषांच्या कर्तृत्वाबद्दल डोळे झाक करत असेल तर विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असेल यात शंका नाही. शाळेमध्ये महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन न करता केवल भारतमातेचे पूजन करून दैवतिकारणाचा संदेश देत शिस्तभंग करण्यात आली.

महापुरुषांना प्रेरणेपासून वंचित ठेवण्याची कारस्थान केल्याबद्दल सदर प्रकरणाची चौकशी करून मुख्याध्यापकाविरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ तामगाडगे यांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती माहूर यांना सादर केले आहे.
निवेदनाची प्रत आणि फोटो शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नदिड यांना सादर करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडसा येथील मुख्याध्यापक माधव कोंडबाजी बाबळे यांनी जाणीवपूर्वक महापुरुषांना डावळत केवळ भारत मातेची प्रतिमा पूजनात ठेवून पुरोगामी राज्यामध्ये दैवती करण्याचा संदेश प्रसारित केला आहे.
यामुळे सर्व संविधानप्रेमी व महापुरुषांना आदर्श मानणाऱ्या नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत.
अश्या घटना वारंवार होत असून गेल्या 15 ऑगस्ट ला शेकापूर येथे सुद्धा ग्रामपंचायतने महामानवाची प्रतिमा न लावताच ध्वजारोहण केले होते.
