आरोग्यताज्या बातम्यामहाराष्ट्रमानवतसामाजिक

देवलगाव (आवचार) येथे मोफत भव्य रोग निदान व आरोग्य तपासणी आणि मोती बिंदू शस्त्र क्रिया शिबिर संपन्न

मानवत / प्रतिनिधी, प्रविण घागरे

मानवत तालुक्यातील मौ. देवलगाव (आवचार ) येथे ०६ मार्च रोजी मोफत भव्य रोग निदान व आरोग्य तपासणी आणि मोती बिंदू शस्त्र क्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त परभणी जिल्हा पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री ना. सौ. मेघनादिदी बोर्डीकर – साकोरे व आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र प्रमुख श्री डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या मार्गदर्शना खाली भारतीय जनता पार्टी मानवत तालुका विकास मगर व शिवसामर्थ्य सोशल फाउंडेशन संचालक पांडुरंग (पप्पु) नखाते,

संचालक महेश कावळे यांच्या वतीने मोफत भव्य सर्व रोग निदान शिबिर व मोतीबिंदू तपासणी व मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिरा चे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिबिरामध्ये २७४ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

त्यापैकी २९ रुग्ण मोती बिंदू आढळून आले त्यांची सर्वांची शस्त्रक्रिया मुंबई येथे शिव सामर्थ्य फाउंडेशन पाथरी यांच्या वतीने सर्व मोफत करण्यात येणार आहे.

यावेळी कार्यक्रमास पांडुरंग ( पप्पु) नखाते डॉ. राम जाधव, मधुकरराव आवचार, केशवराव आवचार,विकास मगर, कृष्णा जाधव, जनार्धन आवचार, शेषराव आवचार, ओंमकार पान्हेरे, महेश कावळे उपस्थित होते शिबीर यशस्वीतेसाठी आशा ताई व नागरिकांनी प्रयत्न केले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!