ताज्या बातम्यामहाराष्ट्रमाहुर श्रीक्षेत्र

माहूर तालुक्यातील रेती चोरट्यांना कशाचेच राहिले नाही भय

✍️समाधान कांबळे (माहुर तालुका प्रतिनिधी)

माहुर (दिनांक २३ एप्रिल) तालुक्यातील चोलेवाडी, टाकळी घाट, वडसा, पडसा, नेर, नागोबा, गोकुळ गोंडेगाव (सुतारवाडी) चा घाट रात्रीच्या वेळी पंधरा ते विस गाड्या चालतात पैनगंगा नदीतून उपसा केला जात आहे काही दिवसापूर्वी नदीवर केलेले खड्डे रेती चोरट्यांनी खड्डे बुजवून रात्रीच्या वेळी रेती उपसा करीत असताना दिसत आहे.

तरी पण तहसीलदार व तलाठी मंडळ अधिकारी हे रेती चोरट्यांना रात्रीच्या वेळेस पाठिंबा देत आहेत का? हा प्रश्न उपस्थित होतो, कारण माहूर येथील युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या पत्रकारांनी जीवाची परवा न करता प्रत्येक रेती घाटावर जाऊन लोकेशन व्हिडिओज व फोटोज काढून त्याचा पाठपुरावा केला होता. यांच्या दबावात येऊन मंडळ अधिकारी व तलाठी यांनी तात्पुरती कार्यवाही म्हणून दोन तीन फुटाचे खड्डे केले होते.

पण काही दिवसातच रेती चोरट्यांनी ते खड्डे बुजवून रेती उपसा सुरू केला आहे. मंडळ अधिकारी व तलाठी यांनी काही स्टॉकांना सिल केले असता तेथील स्टॉक सुद्धा रेती चोरट्यांनी उचलून नेला आहे. या रेती चोरट्यांनी माहूर तालुक्यात फार मोठी धुडगुस घातली आहे.

काल वडसा येथे गाववाल्यांनी रेती गाड्या अडविण्याचा प्रयत्न केला असता तेथील रेती चोरट्याने ऐका मुलाच्या डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला केला तो मुलगा नागपुर येथे भरती आहे हे अशी चर्चा सुरू आहे,

असे हल्ल्याचे अनेक प्रकार माहूर तालुक्यात घडून सुद्धा तहसीलदार व त्यांचे कर्मचारी हलगर्जीपणा करताना दिसत आहे व रेती चोरट्यांना साथ देताना दिसत आहे. नाहीतर या रेती चोरट्यांची कशी काय हिम्मत वाढली कारण यांना प्रशासनाचा पाठिंबा आहे का? अशी तालुक्यातून चर्चा होताना दिसत आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!