क्राइम गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळ

महागांव पोलीस स्टेशन हद्दीतील पुलाचे बांधकामाचे लोखंडी बिम (गज) चोरी करणाऱ्या इसमांस ताब्यात घेवून चोरीस गेलेला मुद्देमाल केला जप्त.

स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते.

त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.

दिनांक 07/10/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद व उमरखेड उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना पोलीस स्टेशन महागांव हददीत असतांना नमूद पथकांस गोपनिय माहीती मिळाली कि, इसम नामे-1) विशाल दिलीप इंगोले 2) राम विठठल दवने 3) अक्षय ऊर्फ बदक्या दिपक खिलारे सर्व रा. जनुना ता. महागांव यांनी काही दिवसापुर्वी करंजखेड पुलावरील बांधकामाचे लोखंडी बिम गज चोरी करुन नेले आहे. त्याबाबत महागांव पोलीस स्टेशन अप क्रमांक 497/2025 कलम 303(2) भान्यास प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

नमूद माहीतीच्या आधारे नमूद पथकांने पोलीस कौशल्याचा वापर करुन अतिशय शिताफिने इसम नामे 1) विशाल दिलीप इंगोले 2) राम विठठल दवने 3) अक्षय ऊर्फ बदक्या दिपक खिलारे सर्व रा. जनुना ता. महागांव यांची माहीती काढली असता नमूद इसमा पैकी इसम नामे 1) विशाल दिलीप इंगोले 2) राम विठठल दवने हे मौजे जनुना फाटा येथे स्प्लेंडर प्लस मोटार सायकल क्रमांक MH-29-BU-3475 यांचेसह थांबले असल्याबाबत माहीती मिळाल्याने नमूद पथक तात्काळ सदर ठिकाणी रवाना होवून त्यांना इसम नामे 1) विशाल दिलीप इंगोले 2) राम विठठल दवने यांना स्प्लेंडर प्लस मोटार सायकल क्रमांक MH-29-BU-3475 सह ताब्यात घेवून पोलीस कौशल्याचा वापर करुन विश्वासात घेवून गुन्हयाचे अनुषंगाने व चोरीस गेलेल्या मालाबाबत विचारपूस केली असता इसम 1) विशाल दिलीप इंगोले यांनी सांगितले कि,

त्यांनी तसेच त्याचे साथीदार 2) राम विठठल दवने यांना 3) अक्षय ऊर्फ बदक्या दिपक खिलारे सर्व रा. जनुना ता. महागांव असे मिळून नमूद मोटार सायकलवर जावून सदर पुलाचे बांधकामाचे लोखंडी बिम चोरी केल्याचे कबूल करुन सदरचा मुददेमाल लोखंडी बिम जनुना शेतशिवारातील राजकुमार नरवाडे यांचे शेततळयात टाकले असल्याचे सांगितल्याने सदर चोरीचा मुददेमाल पंचा समक्ष राजकुमार नरवाडे यांच्या जनुना शेतशिवारातील शेततळयातून पुलाचे बांधकामाचे प्रत्येकी 20 फुट लांबीचे 03 लोखंडी विम किंमत 18,000/- जप्त करुन ताब्यात घेतला. तसेच गुन्हयात वापरेलेली मोटार सायकल किंमत 60,000/- रु असा एकूण 78,000/- रु मुददेमाल जप्त करुन नमूद मुददेमाल तसेच इसम नामे 1) विशाल दिलीप इंगोले वय 22 वर्ष 2) राम विठ्ठल दवने वय 20 वर्ष दोन्ही रा. जनुना ता. महागांव जि. यवतमाळ यांस पुढील तपास कामी पोलीस स्टेशन महागांव यांच्या ताब्यात दिले.

सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हनुमंत गायकवाड सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे, पोउपनि शरद लोहकरे, सफौ/मुन्ना आडे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि/रविंद्र शिरामे, पोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!