ताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळशैक्षणिकसामाजिक

अनुसूचित जाती निवासी मुलींची शासकीय शाळा मरसूळ शाळा व्यवस्थापन समिती स्थापन

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड (दिनांक 22 जुलै) अनुसूचित जाती निवासी मुलींची शासकीय शाळा मरसूळ शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती बोरेकर मॅडम प्रभारी मुख्याध्यापिका प्रमुख अतिथी श्रीमती मोटघरे समाज कल्याण निरीक्षक व मुंगे सर (केंद्रप्रमुख) याप्रसंगी राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांना त्रिवार पुष्प पूजा करून मा.जी.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजयानंद शिंगणकर यांनी पुष्प पूजा करून शाळा व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली.

त्यामध्ये सौ. सुजाता कपिल अंडागळे ह्या अध्यक्षपदी व श्री देवानंद साहेबराव वाडेकर उपाध्यक्षपदी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली शाळा समिती गठित करण्यात महिला मुलींची शाळा 75 टक्के महिला राखीव ठेवण्यात आले आहे.

यात सौ इंदुताई कुरकटे,सौ. कल्पना खडसे.सौ. वंदना जमदाडे.सौ.शारदा सुरोशे ग्रामपंचायत सदस्य महिला रेखाताई धोंगडे विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी नंदिनी सुरवसे व सुप्रिया जमदाडे यांची निवड करण्यात आली

व पुरुष सदस्यपदी अरुण संभाजी घुगरे कैलास कांबळे मिलिंद विनायते त्यामध्ये श्रीमती बोरकर मॅडम सचिव पदी व शिक्षक प्रतिनिधी म्हणून ए .पी. साबळे सर सदस्य निवड करण्यात आली. सूत्रसंचालन बरडे सर यांनी केले व राऊत सर यांनी शाळा व्यवस्थापन समिती संदर्भात माहिती दिली व आभार प्रदर्शन मरसुल येथील पोलीस पाटील यांनी आभार मानले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!