गावठी बनावटीचा देशी पिस्टल बाळगणा-या इसमांस महागांव पो स्टे हददीतून अटक
🚨[पिस्टल (अग्नीशस्त्र) व 1 जिवंत काडतुस असा एकूण 31,000 रु माल जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई]

✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466
यवतमाळ – जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र (अग्नीशस्त्र) बाळगणा-या तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.

दिनांक 09/06/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद हे अउघड गुन्हे आरोपी शोध कामी उमरखेड उपविभाग पोलीस स्टेशन महागांव हददीत असतांना नमूद पथकांस गुप्त बातमीदाराव्दारे माहीती मिळाली कि, मौजे अंबोडा गावच्या हददीत अतिथी हॉटेल जवळ तुळजापूर-नागपूर हायवे रोडवर एक इसम ज्याने अंगात चॉकलेटी रंगाचा शर्ट व क्रिम रंगाची पॅन्ट परिधान केलेले त्याचेकडे एक गावठी बनावटीची देशी पिस्टल असून तो अतिथी हॉटेल जवळ थांबला आहे.

अशी गोपनीय माहिती मिळाल्याने स्थागुशा पथक तात्काळ पंचासह अतिथी हॉटेल तुळजापूर-नागपूर हायवे रोड येथे रवाना होवून संशयीत इसम यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव रवि संतोष शिंगारे वय 29 वर्ष, रा.धम्मनगर श्रीरामपुर पुसद ता. पुसद जि. यवतमाळ असे सांगितल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला गावठी बनावटीचा देशी पिस्टल किंमत अंदाजे 30,000/- रु तसेच एक राऊड ( काडस्तुस) किंमत 1000/- रु असा एकूण 31,000/-रु माल मिळून आल्याने तो जप्त करुन ताब्यात घेवून नमूद इसम यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन महागांव येथे अप क्रमांक 320/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25 अन्वये गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे.


सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात स.पो.नि.धिरज बांडे, पोउपनि/अमोल राठोड, सफौ / मुन्ना आडे, सफौ/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि/रविंद्र शिरामे, सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.



