गावंडे महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार विशेष शिबिराचे आयोजन

✍️ बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड (दि. १६ फेब्रुवारी) येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार विशेष शिबिर दि.१७ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, दत्तक ग्राम मरसूळ, उमरखेड येथे आयोजित केले आहे.


यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाजाचे संस्थेचे सचिव डॉ. यादवरावजी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमाला विशेष शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड, सतीश दर्शनवाड , पत्रकार संतोष कलाने उपस्थित राहणार आहेत.

यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर यांच्या शुभहस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार आहे.
या शिबिरादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

नेत्र चिकित्सा, दंतचिकित्सा, लसीकरण कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आरोग्य जनजागृती, पर्यावरणाशी संबंधित कार्यक्रम, स्वच्छ भारत, आर्थिक घडामोडी, जलसंवर्धन, कृषी, उद्योजकता, व्यक्तिमत्त्व विकास, महिला सक्षमीकरण, बेटी बचाव, बेटी पढाव, मतदान जनजागृती, युवा विकास ह्या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

दत्तक गावासाठी आवश्यक असलेले ग्राम स्वच्छता, शोषखड्डे तयार करणे, बंधारा बांधणे हे उपक्रम शिबिरात राबवले जाणार आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली शिबिराचा समारोप कार्यक्रम होईल.

प्रमुख अतिथी म्हणून उमरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ तसेच मनोहर नाकितवाड हे असतील. प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रशांत अनासाने, प्रा. अर्चना मिटके, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.
