भारतीय बौद्ध महासभेच्या तालुकाध्यक्षपदी ॲड.छंदक वाठोरे तर तालुका सरचिटणीस प्रा.विनोद कांबळे यांची निवड

✍️समाधान कांबळे (माहूर तालुका प्रतिनिधी)
माहूर (दिनांक 15 जुलै) भारतीय बौद्ध महासभा माहूर च्या तालुका शाखा अध्यक्षपदी ॲड.छंदक वाठोरे, तालुका सरचिटणीस प्रा.विनोद कांबळे तर तालुका कोषाध्यक्षपदी प्रा. डॉ.राजेंद्र लोणे यांची निवड करण्यात आली.

भारतीय बौद्ध महासभेचे नांदेड जिल्हा कोषाध्यक्ष आद.सुभाष नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली व हिशोब तपासणीस आद.अप्पाराव येरेकार व किनवट तालुका पर्यटन व प्रसार उपाध्यक्ष – आद.सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होऊन माहूर तालुका कार्यकारिणी (ता.१३जुलै.रविवारी) पुढीलप्रमाणे निवडण्यात आली.

तालुका अध्यक्ष -ॲड.छंदक वाठोरे, तालुका सरचिटणीस- प्रा.विनोद कांबळे, तालुका कोषाध्यक्ष- प्रा.डॉ.राजेंद्र लोणे, उपाध्यक्ष (संस्कार) -विजय भगत, उपाध्यक्ष (पर्यटन व प्रसार)-प्रकाश मुनेश्वर, उपाध्यक्ष (संरक्षण)-आकाश कांबळे,कार्यालयिन सचिव -रविंद्र गायकवाड, हिशोब तपासणीस -ॲड.सुभाष कांबळे,


संस्कार सचिव -ॲड.राहुल भवरे, संस्कार सचिव -प्रविण वाघमारे, पर्यटन /प्रसार सचिव -दिपक कांबळे, पर्यटन/प्रसार सचिव -मनोज किर्तने, संरक्षण सचिव-रेणुकादास वानखेडे, संरक्षण सचिव -महेंद्र वाघमारे,संघटक सर्कल -शेषेराव पाटील, संघटक सर्कल -राजु जाधव, संघटक सर्कल -शामराव राऊत, संघटक सर्कल -सिद्धार्थ तामगाडगे, संघटक सर्कल -सुभाष खडसे, संघटक सर्कल -दयानंद भगत,तर संघटक सर्कल मनून डॉ.झनक मानकर यांनी निवड झाली.
