आपली समस्या – आपला पुढाकार अभियाना अंतर्गत कार्यशाळा
🪙मुव्हमेन्ट फॉर पिस ॲन्ड जस्टीस (एमपी जे) चा उपक्रम🪙

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक) मो.9823995466
उमरखेड :- (दिनांक 12 जुलै) आज महाराष्ट्रातील प्रत्येक शहर आणि गावातील लोकांना विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता, सुरक्षा, आरोग्य, शिक्षण यासारख्या समस्यांना प्रत्येक व्यक्तीला तोंड द्यावे लागते.

या समस्या सोडवण्यासाठी, सर्व भागधारकांनी (सरकार, नागरिक आणि स्थानिक प्रशासन इत्यादी) या समस्यांबद्दल संवेदनशील असणे आणि त्यांना उपाय प्रक्रियेत सहभागी करून घेणे महत्वाचे आहे. ही मोहीम स्थानिक समस्यांवर प्रकाश टाकण्याचा आणि त्या सोडवण्यासाठी सामूहिक प्रयत्न सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
स्थानिक समस्या ओळखणे आणि अधोरेखित करणे,या समस्यांबद्दल सर्व भागधारकांना संवेदनशील करणे, सामान्य माणसाला सक्षम करणे आणि सार्वजनिक समस्यांच्या निराकरणात लोकसहभाग सुनिश्चित करणे जेणेकरून ते त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी आवाज उठवू शकतील.

या उदात्त उद्देशाने मुव्हमेन्ट फॉर पिस ॲन्ड जस्टीस (एमपीजे MPJ) या सामाजिक संघटने तर्फे राज्यभर एक महीना “समस्या आपली -पुढाकार आपला ” अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानाअंतर्गत जिल्हातील कार्यकर्ता साठी स्थानिक गुरु कॉम्पलेक्स नांदेड रोड येथे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. यात तंझीम अन्सारी प्रदेश उपाध्यक्ष , अलताफ हुसेन प्रदेश कार्यकरिणी सदस्य , ॲड . यांनी मार्गदर्शन केले या वेळी कमाल अन्सारी भिवंडी , हाफीज अन्सार , फिरोज अंसारी उपस्थित होते.


कार्यशाळेसाठी डॉ फारूक अबरार ,इरफान खान , सै रजा , रेखा ताई गायकवाड , आरेफा नसीर , स्वरांजली वाघमारे, फरहत जहा , शफील राज , प्रकाश चव्हाण , शेवाळे टेलर , कय्युम अली, तस्लीम अहेमद , सै. सलीम , कामरान खान , जुनेद शेख , फैसल अकील आदी कार्यकर्तेनी परिश्रम घेतले.
