मानवत येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रजासत्ताक दिन उत्सहात साजरा

[ गट निदेशक कल्याण पटेकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न]
✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)
✍🏻 प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी) मो. 8308755238

मानवत (दिनांक २६ जानेवारी) मानवत येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण गट निदेशक कल्याण पटेकर यांचे हस्ते संपन्न झाले.

प्रजासत्ताक दिनाचे महत्व या विषयावर जेष्ठ निर्देशक मधुसदन सोनवळकर व जिंतूर पॉलीटेक्निक कॉलेज चे प्रा. कोक्कर यांनी माहिती दिली २६ जानेवारी निमित्त जिल्हा क्रीडा स्पर्धा परभणी आय टी आय संस्थेत २२ व २३ जानेवारी रोजी आयोजीत करण्यात आल्या होत्या.

यामध्ये मानवत शासकिय आय. टी आय. च्या प्रशिक्षणार्थी यांनी स्पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावला खो – खो मुलांचा गट जिल्हा प्रथम क्रमांक सहभाग प्रशिक्षणार्थी अमोल खंदारे, शेख, गणेश राठोड बुद्धीबळ स्पर्धा प्रथम क्रमांक ओंकार राऊत व कु. प्रिती जाधव प्रथम क्रमांक रनिंग (धावणे) कु. इंद्रायणी इचके प्रथम क्रमांक व
मोहन मगर तिसरा क्रमांक कॅरम स्पर्धा कु. प्रिती जाधव व कु. प्रतिक्षा शिंदे हिने प्रथम क्रमांक गट मिळवला गट निर्देशक कल्याण पटेकर यांचे मार्गदर्शना खाली संयोजक निर्देशिका कु. आश्विनी नाटकर श्रीमती दिक्षा कौर, निर्देशक संजय पवार, वल्लमवाड, गुरुलिंगे म्हात्रे व परमेश्वर गीरी

यांनी विवीध स्पर्धा साठी मार्गद र्शक कोच म्हणून कामगीरी पूर्ण केली सर्व विजेता टीमचे प्रभारी प्राचार्य सी. सी. देशपांडे मुख्य लिपीक मंगेश मूळे, निर्देशक आनंदा जगाडे, शिवलिंग कुंभार, किशोर जाधव, संदेश झाडे, भांडारपाल रोकडे व सर्व कर्मचारी व मानवत शहरातील प्रतिष्ठीत मंडळी व पत्रकार बांधव यांनी अभिनंदन करून पुढील होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धा छ. संभाजी नगर साठी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
