उमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसन्मान सत्कारसामाजिक

वाढदिवसाच्या औचित्याने शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक 05 जुलै) तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा बोरी चातारी येथे मराठा सेवा संघ उमरखेड चे उपाध्यक्ष सुरेश माने सर यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला. तसेच शाळेची विद्यार्थ्यांनी कु. शर्वरी सुगमवाड हिचा नवोदय विद्यालय घाटंजी येथे निवड झाल्याबद्दल सुरेश माने, पोलीस पाटील व शाळेतर्फे बक्षीस व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

शाळेत १ली ७ वी पर्यंत शिक्षण घेतलेली विद्यार्थिनी कु पल्लवी माने ही डाॅक्टर झाल्याबद्दल तिचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.डाॅक्टर पल्लवीने विद्यार्थ्यांना जि.प.शाळेत शिक्षण घेऊनही यश प्राप्त करता येते याबद्दल मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमास गावचे पोलीस पाटील प्रदीप माने, डाॅ.पल्लवी माने मुख्याध्यापक कैलास कोंडरवाड, शिक्षक घनश्याम सुगमवाड,सुरेश गिते,अवित राठोड,अंगणवाडी सेविका सुरेखा रोकडे, स्वयंसेविका प्रांजली माने, वंदना माने, अरविंद माने आदी उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!