आरोग्यताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळविशेषशैक्षणिकसामाजिक
जागतिक फार्मसी दिनानिमित्त मूकबधिर मुलांना मेडिकल प्रथम किट व वही पेन खाऊच वाटप

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो. 9823995466
ढाणकी – आज दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी जागतिक फार्मसी दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस एक आगळावेगळा दिवस म्हणून आम्ही आज मधुकरराव नाईक मूकबधिर विद्यालय ढाणकी येथे मुलांना मेडिकल प्रथम किट व वही पेन खाऊच वाटप केलं आणि संपूर्ण गावातून एक रॅली काढली.

या रॅलीमध्ये ढाणकी येथील सर्व मेडिकल चालक फार्मासिस्ट उपस्थित होते.

त्यामध्ये प्रदीप भाऊ पिंपळवार दिनेश पाटील रावते, संजूअण्णा, सुनीलभाऊ, अविनाशभाऊ पवार, रवींद्र रावते, व्यंकटेश मुक्कावार, साहेबराव वाघमोडे, सुनीलभाऊ सोनसेटवार व सर्व मेडिकल स्टोअरवर चालक उपस्थित होते.
