उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळविशेषसामाजिक

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अतिक्रम हटवा नाही तर उग्र आंदोलनं छेडू

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

🔴(जिजाऊ ब्रिगेड प्रदेश सहसचिव सरोज देशमुख यांचा प्रशासनाला इशारा🔴

उमरखेड- शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अतिक्रमण हटवा…! या मागणीसाठी दिनांक 16 जून पासून गजानन देशमुख हे आमरण उपोषण करत आहेत. त्यांचा आमरण उपोषणाचा नववा दिवस प्रशासनाला व शासनाला माहीत असून सुद्धा ते त्यांच्याकडे मुद्दामहुन दुर्लक्ष करत आहेत.

तरी लवकरात लवकर यावर तोडगा काढून शिवप्रेमींना दिलासा द्यावा. जर उपोषणकर्त्या ची तब्येत खालावली आणि त्यावर उपाय योजना नाही केल्या अतिक्रमण नाही हटविले तर जिजाऊ ब्रिगेड व शिवप्रेमी हे तीव्र आंदोलन करतील.

या मागणी सह छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अतिक्रमण काढावे.अशा मागणीच्या संदर्भामध्ये उपविभागीय अधिकारी यांना जिजाऊ ब्रिगेड तर्फे निवेदन देण्यात आले.

यावेळी सरोज देशमुख,अश्विनी कनवाळे,सुरेंद्र पवार,अनिता विनकरे, गजेंद्र ठाकरे, अरुण ठाकरे, शुभम माने, संजय शिंदे दिनेश रावते, पांडुरंग पाटील विठ्ठल कदम इत्यादी हजर होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!