ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसामाजिक

राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा पाया रचला प्रा. विठ्ठल कांगणे

परभणी / प्रतिनिधी प्रविण घागरे

परभणी (दिनांक 26 जून) सामाजिक बदल घडवण्यासाठी स्वतःच्या मुलीचा विवाह आंतरजातीय पद्धतीने करून समाजातील इतरांना प्रोत्साहित करून आदर्श निर्माण केला अस्पृश्य समाजाला व्यवसाय निर्माण करण्याची संधी देऊन सामाजिक न्याय प्रस्थापित केला.

हा राजर्षी शाहू महाराजांनी रचलेला समतेचा पाया आहे. त्यांची जयंती साजरी करत असताना समाजाने समतेच्या पायावर स्वतः चालून समाज घडवावा असे आवाहन प्रा विठ्ठल कांगणे यांनी केले.

धम्म मैत्री संवाद अभियानाच्या वतीने बी रघुनाथ सभागृहात संपन्न झालेल्या लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती सोहळ्यात प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. विठ्ठल कांगणे बोलत होते.परभणी शहर महानगरपालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव यांचा हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटकी मनोगत व्यक्त करताना धैर्यशील जाधव म्हणाले की, यशवंत चे शाहू महाराज झाले त्यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श समाज रचनेसाठी प्रेरणा स्त्रोत आहे. छत्रपती शाहू महाराज आपण जगण्यात अवलंबविला पाहिजे असे ते म्हणाले. या सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी वनामकृवि सहाय्यक कुल सचिव सुरेश हिवराळे हे होते.

या वेळी विचार मंचावर स्वागताध्यक्ष गौतम मुंडे, भदंत मुदितानंद थेरो, रिपाई चे ज्येष्ठ नेते डी. एन. दाभाडे, राणूबाई वायवळ, सुनीताताई साळवे, सुशील कांबळे, प्रा. डॉ. प्रवीण कनकुटे, करण गायकवाड, कचरुदादा गोडबोले, संजय भराडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. सोहळ्याच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन चरित्रावर गीत प्रबोधनातून शाहिर दासराव पुंडगे ढोलकी सम्राट सुभाष जोगदंड आणि संचाचे सांस्कृतिक सादरीकरण केले.

या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रास्ताविक संजय बगाटे यांनी केले या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी निमंत्रक गौतम भराडे, एम. एम बरे सुधाकर श्रीखंडे सुदामराव तूपसुंदरे सुनील पवार भूषण मोरे रवी वाव्हळे ॲड. सुमन उफाडे ॲड. मयुरी शिरसाठ, सुमित्रा लझडे रेखा पाईकराव आदींनी पुढाकार घेतला.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!