ताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळशैक्षणिक

उमरखेड तालुक्यातील कृषी महाविद्यालय येथे कृषीकन्या तर्फे माती प्रशिक्षण याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन..!

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक 17 जून) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा अंतर्गत कृषी माहाविदयालय उमरखेड विदयाथीनीनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमात उमरखेड या गावात नुकतेच माती परिक्षण व माती परिक्षणाच महत्त्व उपयोग व फायदे यावेळी शेतकऱ्यांना समाजावून सांगण्यात आले.

यावेळी माहाविद्यालयाच्या सातव्या संत्राच्या विदयार्थीनीनी, अनुष्का चाकले शिवाई मगर, ऋतुजा विनायते, अल्का मटाले दिशा मानगी, तेजस्विनी नाईक यांनी यात अत्यंत सक्रिय सहभाग घेत माती परिक्षणाची प्रात्याक्षिके सुंदरपणे सादर केली.

त्यांच्या शास्त्रीय आणि सविस्तर मार्गदर्शनाला गावातील शेतकरी, भगवानराव शिंदे, उत्तमराव शिंदे बाबाराव शिंदे, अजयराव माहेश्वरी, यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून उस्फूर्त प्रतिसाद दिला. हा संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी माहाविद्यालयाचे प्राचार्य मा. एस. के. चिंतले प्रोग्राम आँफिसर ए. बी. इंगळे, वाय. एस. वाकोडे समन्वयक ए. एस. राऊत, व्ही. बी. शिंदे यांचे अमूल्य मोलाचे महत्त्वपूर्ण सात्यपूर्ण मार्गदर्शन लाभले.

या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे शास्त्रीय शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले असून त्यांच्या ज्ञानात निश्चितच मोलाची भरीव भर पडली.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!