ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतशैक्षणिक

मानवत येथील इकरा सेमी इंग्लिश पहिल्या दिवशी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

मानवत / प्रतिनिधी. प्रविण घागरे

मानवत येथील इकरा सेमी इंग्लिश स्कूल मध्ये १६ जून रोजी शैक्षणिक वर्ष 2025 – 2026 च्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व शालेय पुस्तके देऊन अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य व आनंद फुलवणारा हा उपक्रम विशेष आकर्षण ठरला. या वेळी संस्थेचे सचिव हाजी एम. ए. रिजवान बागवान, शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिराज अली खान, तसेच सर्व शिक्षकवर्गाच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व अभ्यास क्रमाची पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.

शाळेच्या प्रांगणात चिमुकल्यांच्या रांगा, हातात फुले आणि नव्या पुस्तकांचा गंध, हे दृश्य भारावून टाकणारे होते. मुख्याध्यापक सिराज अली खान यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास, शिस्त व नैतिक मूल्यांची जाण ठेवत यशाकडे वाटचाल करण्याचे आवाहन यावेळी केले तर संस्थेचे सचिव हाजी रिजवान बागवान यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वां गीण विकासासाठी संस्थेचे प्रयत्न अविरत सुरू राहतील असे यावेळी सांगितले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यां मध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून पालक आणि नागरिकांकडून शाळेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!