पीरंजी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती हर्ष उल्हास यामध्ये साजरी करण्यात आली आहे.

दिनांक 14 एप्रिल भीमराज मित्र मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली आहे. भीमराज मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कराव तेवढे कौतुक कमी, सर्व प्रथम पहिले विहाराची रंगरंगोटी पूर्ण केलीआहे.

विहाराचा सर्व परिसर स्वच्छ केला आहे. पाईप टाकून त्यावर सर्व भीमराज मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एक दिवसाचे श्रमदान करून मेन रोड पासून दुसऱ्या रोडला जोडणारा रस्ता तयार केला आहे.

विहाराजवळ भीम नगर नावाची डिजिटल पाटी तयार करून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिनांक 13 एप्रिल रोजी ला सर्व गाव जेवणाचं भोजनदान दिले आहे.

यामध्ये अन्नदान करणारे 16 जणांची समिती समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये पुतळा समितीचे अध्यक्ष भीमराज मित्र मंडळ सखाराम धुळे, मल्हारी दवणे, माजी सरपंच अनंतराव पाईकराव, गणेश पाईकराव,

मंगल दवणे,प्रकाश पाईकराव, भाऊराव सावते संजू, पाईकराव, भीम शाहीर देवानंद पाईकराव, आत्माराम गायकवाड, बबलू भालेराव, राजाभाऊ दवणे,गजानन गायकवाड प्रभाकर पाईकराव, देवानंद लक्ष्मण पाईकराव, सिद्धार्थ पाईकराव, व भीमराज मित्र मंडळाच्या सहकार्याने भोजनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला आहे.

14 एप्रिल सकाळी ठीक नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरुवात करण्यात आली, रॅ डीजे च्या माध्यमातून सर्व लहान मुला व महिला मंडळांना भीम गीताचा डीजेचा आनंद घेतला आहे. भीमराज मित्र मंडळाच्या वतीने सर्व गावकऱ्यांचे व बौद्ध वाड्यातील सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवानंद पाईकराव यांनी केले तर आभार प्रदर्शन समितीचे अध्यक्ष सखाराम गायकवाड यांनी केले आहे.