ताज्या बातम्यानांदेड जिल्ह्यातीलमहाराष्ट्रमाहुर श्रीक्षेत्र

बोअरवेल ट्रकची दुचाकीला जोराची धडक; दुचाकीवरील दोघे गंभीर यवतमाळ येथे हलविन्यात आले.

[“दुचाकीवरील दोघांचे पाय चेंदामेंदा ; आसोली फाट्यानजीकची घटना”]

✍🏻समाधान कांबळे (श्रीक्षेत्र माहूर तालुका प्रतिनिधी)

श्रीक्षेत्र माहूर (दिनांक 13 जून) किनवट राष्ट्रीय महामार्गावरील आसोली फाट्यावर बोअरवेल मशीनवाहक ट्रकने कामावरून मोटरसायकल द्वारे परत येत असलेल्या दुचाकीस्वारांना जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि. १३ रोजी सकाळी ७ वाजता घडली व दोन्ही दुचाकी स्वरांचे पाय कापण्यासारखि परिस्थिती निर्माण झाल्याने बघनाऱ्याच्या मनात हळहळ व्यक्त होत होती.

माहूर तालुक्यातील कसारपेठ आश्रमशाळा परिसर येथील लिंगू शंकर आडे वय २८ व संजय तुकाराम येरमे वय २३ वर्षे हे दोन युवक आज सकाळी त्याची दुचाकी क्र. एम.एच. २६ बी.आर. ६३०९ या दुचाकीने माहूर येथे काही कामानिमित्त गेले होते. तेथून परत येत असताना सकाळी ७ वा. च्या सुमारास माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील आसोली फाट्यानजीक वाई बाजार कडून माहूरकडे जात असलेल्या बोअरवेल मशीन वाहक ट्रकने त्यांना जोराची धडक दिली.

या धडकेत दुचाकीवरील दोन्ही युवकांच्या उजव्या पायाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला असून मांडीच्या हाडाच्या ठिक-या उडाल्या तर एकाच उजवा हात आणि उजव्या पायाची बोटे पण मोडलेली आहे.

रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होत असल्याने डॉ बीपीन बाभळे यांनी यवतमाळला रेफर करण्याआधी एकावर रुग्णवाहिकेत तर दुसऱ्या जखमीवर दवाखान्याच्या बाहेरच उपचार करून तत्परता दाखवत तात्काळ यवतमाळला हलविले अपघाताची माहिती वाई बाजारच्या रुग्णवाहिका चालक प्रशांत कोरे यांना मिळाल्याने त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ दोन्ही जखमींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले

असता येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विपीन बाभळे यांच्यासह त्याच्या सहका-यांनी प्राथमिक उपचार करून दोन्ही जखमी युवकांना पुढील उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रूग्णालयात पाठविले माहूरच्या ग्रामीण रुग्णालयाची 108 ॲम्बुलन्स अनेक दिवसापासून नादुरुस्त असल्याने सतत होत असलेल्या अपघातातील जखमींना बाहेरगावी उपचारासाठी पाठवण्यास अडचण निर्माण होत असल्याने माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दोन 108 ॲम्बुलन्स द्यावे अशी मागणी होत आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!