ताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळशैक्षणिक

यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संचलित सावित्रीबाई फुले कन्या शाळा महागांव येथील शिक्षक गुणवंत शिवरकर यांची बोगस नियुक्ती.

✍🏻 बबलू भालेराव (मुख्य संपादक)
✍🏻 सिद्धार्थ दिवेकर (सह संपादक)

यवतमाळ (दिनांक 7 जून) जिल्हा अखिल कुणबी समाज संचलित सावित्री बाई फुले कन्या शाळा महागांव येथील शिक्षक गुणवंत नारायण शिवरकर यांची समायोजनावर झालेली नियुक्ती बोगस असून शिक्षण विभागाकडून त्यांना अदा करण्यात आलेला पगार व्याजासह वसूल करण्यात यावा अशी लेखी तक्रार रुख्मिणी साहेबराव भांगे या शिक्षिकेने शिक्षण अधिकारी (माध्यमिक )जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या कडे केली आहे.

शालेय सत्र 2016/17 मध्ये गुणवंत नारायण शिवरकर विवेकानंद हायस्कुल पांढुर्णा ता. घाटंजी जि.यवतमाळ या शाळेतून सावित्री बाई कन्या शाळा महागांव जि. यवतमाळ या शाळेत समायोजन करण्यात आले कागदोपत्री पदवीधर दर्शवून सदरील समायोजन करण्यात आले पण त्याची वास्तविक पात्रता एच. एस. सी. सी. टी. सी. नमूद आहे या वरून असे निदर्शनास येते कि सदर नियुक्तीत बरीच तफावत आहे.

बिंदू नामावली नुसार गुणवंत नारायण शिवरकर यांच्या नावासमोर त्यांचा नियुक्ती दिनांक 4/6/2016 दर्शविण्यात आला परंतु मान्यता आदेश क्रमांक व दिनांक नमूद करण्यात आला नाही. शिवरकर यांच्या नावासमोर त्याची शैक्षणिक अहर्ता एच. एस. सी. सीटीसी. व पदनाम शिक्षण सेवक आहे.या वरून असे दिसते कि सदरील शिक्षकाकडे पदवी नसतांना ते बीएड किंवा डीएड नसतांना केवळ सीटीसी च्या आधारे पदवीधर कसा होऊ शकतो ?शिवरकर यांची नियुक्ती व समायोजन ही शासनाची धूळफेक करणारी असून त्याची सखोल चौकशी करून ती नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी रुख्मिणी साहेबराव भांगे या शिक्षिकेने केली आहे.

यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संचलित राम देवसरकर अध्यक्ष असलेल्या या संस्थेत झालेल्या गैरप्रकारावर शिक्षण विभाग कोणती कारवाई करणाऱ्याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

चौकट:- या गंभीर प्रकरणी शासनाला लेखी स्वरूपात खोटी माहिती, कागदपत्रे सादर करून दिशाभूल करून शासन निधीचा वेतन स्वरूपात अपहार देखील झाल्याचे निदर्शनास येते सदरील प्रकरणी दोषी विरुद्ध फॊजदारी गुन्हे दाखल करावेत. तक्रारकर्त्या – – रुख्मिणी साहेबराव भांगे

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!