घरकुल बांधकाम न करता बिले काढणार्या सरपंच व अभियंता त्यांचेवर फौजदारी कारवाई करा – नवनिर्माण बंजारा क्रांती सेने चे निवेदन

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)
उमरखेड (दिनांक ३० मे) तालुक्यातील आकोली येथील नागरिकांना शासनाने घरकुल मंजूर केले व पहिला हप्ता पंधरा हजार सुद्धा जमा झाला परंतु लालचे पोटी सरपंच व अभियंता यांनी आर्थिक देवाणघेवाण करुन संबंधित लाभार्थी यांचे बांधकाम न करता च बिले काढली.

आकोली येथे अनेक योजना चा बट्ट्याबोळ होत आहे घरकुल मंजूर करण्यासाठी तिन हजार द्या अन घरकुल घ्या अशा बातम्या अनेक वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या याची दखल घेऊन संबंधित पदाधिकारी यांनी आकोलीवासियांचे आठ लाख रुपये परत केले.

हा विषय संपताना संपता आता बांधकाम न करताच घरकुलाचे पैसे काढून देण्याचा प्रकार अकोली ग्रामपंचायत मध्ये होताना दिसत आहे घरकुल यादीच्या अनुषंगाने तीन ते चार लोकांचे बांधकाम न करताच घरकुलाचे बिल काढल्याचे उघडकीस आली आहे.

या संदर्भात नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल राठोड यांनी संबंधित गटविकास अधिकारी जिल्हाधिकारी ग्रामविकास मंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे.
संबंधित बिल काढणारे सचिव व अभियंता यांच्यावर फौजदारी कारवाई न झाल्यास नवनिर्माण बंजारा क्रांती सेना आंदोलन करेल असा इशारा संबंधित निवेदनात देण्यात आले आहे.
