क्रांतीकारी शेतकरी संघटनेचा मानवत तालुकाध्यक्ष पदी श्री. अशोक चोखट पाटील यांची निवड..!
(निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव)

✍️प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी)
मानवत :- तालुक्यातील सारंगापुर येथिल सामाजिक युवा कार्यकर्ते श्री. अशोक कारभारी चोखट पाटील यांची नुकतीच क्रांतीकारी शेतकरी संघटनेचा मानवत तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. रविकांत भाऊ तुपकर यांच्या आदेशाने व त्यांच्या उपस्थितीत त्यांना निवडीचे नियुक्ती पत्र देण्यात आले.
तसेच शेतकऱ्यांसाठी व कष्टकऱ्यांसाठी मानवत तालुक्यामध्ये जोमाने काम करून क्रांतीकारी शेतकरी संघटना व स्व.शरदजी जोशी यांचे विचार तालुक्यातील गांव गाड्यातील घरा घरात पोहोचवावे असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष रविकांत भाऊ तुपकर , जिल्हाध्यक्ष भगवान शिंदे यांच्या सह संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होत त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
