महाराष्ट्रराजकियविशेष

मानवत तालुक्यातील नरळद येथे वं ब युवा आघाडीच्या वतीने ई. व्ही. एम. विरोधी जन आंदोलन स्वाक्षरी मोहीम

[स्वाक्षरी मोहिमेत नागरिकांचा प्रतिसाद]

✍️ बबलु भालेराव (मुख्य संपादक)

✍️ सिध्दार्थ दिवेकर (सहसंपादक)

✍️प्रवीण घागरे (मानवत तालुका प्रतिनिधी) मो. 8308755238

मानवत तालुक्यातील मौ. नरळद येथे १४ डिसेंबर रोजी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने ई. व्ही. एम. विरोधी जन आंदोलन स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आद. अ‍ॅड. बाळा साहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या आदेशाने जिल्ह्यासह तालुक्यात ठिक ठिकाणी ई. व्ही. एम. विरोधी जन आंदोलन स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत असून याच अनुषंगाने आज पाथरी मतदार संघातील व मानवत तालुक्यातील मौ. नरळद येथे ई. व्ही. एम. विरोधी स्वाक्षरी आंदोलन राबविण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे रंणजीत तूपसमुंद्रे, जयवंत तुपसमुंद्रे, प्रसाद तिथे, विकास तूपसमुंद्रे, वैभव तूपसमुंद्रे, अभिजीत तूपसमुंद्रे, नवनाथ तिथे, नागेश तूपसमुंद्रे, निशांत तूपसमुद्रे , संतोष तूपसमुंद्रे यांच्या सह कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!