उमरखेडमहाराष्ट्रशैक्षणिक

मरसूल येथील अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या अखेर बदलीचा आदेश

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) मो.9922870518 ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक) मो. 9823995666

उमरखेड (दिनांक 25 डिसेंबर) तालुक्यातील मरसूल येथील अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या संगनमताने भोजन ठेकेदार व त्यांच्या पत्नीच्या हस्तक्षेपामुळे मुलींना वेळेवर व्यवस्थित भोजन मिळत नव्हते.या प्रकरणाची कसून चौकशी करावी.

अशी तक्रार शाळेच्या प्रभारी अधीक्षिकेने अमरावती प्रादेशिक उपयुक्त समाज कल्याण विभाग यांच्याकडे केली होती.

केलेल्या चौकशी वरून सहआयुक्त समाजकल्याण विभाग पुणे यांनी सदर मुख्याध्यापिकेवर मनमानी कारभाराचा ठपका ठेवून त्यांची शेगाव येथे बदली करण्यात आल्याचा आदेश धडकला आहे.

मरसुल येथील अनुसूचित जाती मुलींच्या शाळेवर प्रभारी अधीक्षक म्हणून कार्यरतनिकृष्ठ आहारप्रकरण मुख्याध्यापिकेला भोवले असलेल्या कनिष्ठ लिपिक एमडी सरकटे यांनी शाळेच्या मुख्याध्यापक यांना आपला प्रभारी अधीक्षक पदाचा कारभार काढण्यात यावा.

असे पत्र देऊन त्याच्या प्रती वरिष्ठांकडे पाठविल्या होत्या.

तक्रारीत मुख्याध्यापिका लीना लिचडे व भोजन ठेकेदार यांच्या संगनमताने शाळेतील विद्यार्थिनींना निकृष्ट दर्जाचे भोजन दिल्या जात आहे व आपण प्रभारी अधीक्षिकाशेगाव येथील मुलींच्या शासकीय निवासी शाळेत बदलीत्यानुसार महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाहताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 नुसार उपका ठेवून, सहआयुक्त समाज कल्याण विभाग पुणे ओम प्रकाश बकोरिया यांनी मरसुळच्या मुख्याध्यापिका लीना लिचडे यांची बुलढाणा येथील रोगावच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलीची शासकीय निवासी शाळेच्या मुख्याध्यापक पदावरकरण्यात आली आहे.

प्रशासकीय बदलीने पदस्थापनेचे आदेश शुक्रवारी (दि. 20) दिले आहेत.म्हणून काम पाहत आहे. याबाबत संबंधितांना वारंवार सूचना देण्याचा प्रयत्नभोजन वाटपात सावळा गोंधळ प्रकरणकरीत असल्याने त्यांच्याकडून मानसिक त्रास होतो आहे, असे तक्रारीत नमूद करून कारभाराचे वाभाडे काढले होते.

मरसूळ येधील मुलींच्या शासकीय निवासी शाळेत दोन वर्षापासून प्रभारी अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एमडी सरकटे यांनी येथील मुख्याध्यापक यांच्या मजर्जीतील शाळेचे भोजन ठेकेदार व त्यांच्या पत्नी या नियमानुसार दूध, फळ, अंडी वाटप करीत नाहीत.

भोजनही वेळेवर व्यवस्थित देत नाहीत. त्यामुळे आपण प्रभारी अधीक्षक म्हणून कार्यरत असल्याने आपण याबाबत त्यांना वारंवार सूचना करीत असतानाही कुठल्याही प्रकारची दखल न घेता, त्यांच्याशी वाद घालतात. सदर प्रकार हा मुख्याध्यापकांच्या मर्जीने सुरू असल्यानेशाळेतील विद्यार्थिनींना अपुरे जेवण मिळून त्यांच्या मानसिकतेवर तणाव येत असल्याने अभ्यासावर परिणाम होत असल्याचेही सदर पत्रात सरकटे यांनी नमूद केले आहे.

या प्रकाराला प्रभारी अधीक्षक म्हणून विरोध करीत असल्याने मानसिक त्रास दिल्या जात आहे. तसेच प्रभारी अधीक्षक पदाचा कारभार काढून घेण्यात यावा, असेही पत्रात म्हटले आहे. प्रादेशिक उपयुक्त कार्यालय अमरावती, सहाय्यक आयुक्त कार्यालय यवतमाळ यांच्याकडे पत्राची प्रत पाठविण्यात आली होती.

प्रकरणाची चौकशी प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाकडून करण्यात आल्यानंतर सदर चौकशी अहवाल सहआयुक्त समाज कल्याण विभाग पुणे यांच्याकडे पाठविण्यात आला होता.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!