RTSE 2025 परीक्षेत अदिती जाधवचा राज्यात प्रथम क्रमांक!

✍🏻समाधान कांबळे (श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी)
किनवट/माहूर (दिनांक 13 मे) जिनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल, माहूर येथील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी कु. अदिती ज्ञानेश्वर जाधव हिने Rationalist Talent Search Exam (RTSE) 2025 या राज्यस्तरीय परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवून माहूर, किनवट व नांदेड जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे.

अदितीने या परीक्षेत 200 पैकी 190 गुण मिळवत गणित, विज्ञान व सामान्य ज्ञान विषयात आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली. तिला प्रमाणपत्र, पदक आणि शिष्यवृत्ती जून 2025 मध्ये दिली जाणार आहे.
या यशामागे शाळेचे आधुनिक शिक्षण, शिक्षकांचे समर्पण, वडील ज्ञानेश्वर जाधव यांचे पाठबळ आणि अदितीची मेहनत यांचे योगदान आहे.

अदितीचे स्वप्न शास्त्रज्ञ होऊन देशासाठी काहीतरी मोठे करणे आहे.
जिनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल माहूर येथील शिक्षक, पालक आणि परिसरातील नागरिकांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, अदितीचे हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
