एस टी महामंडळाचा 77 वा वर्धापन दिन मानवत येथे उत्सहात साजरा

✍️प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी)
मानवत (दिनांक 4 जून) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 77 व्या वर्धापन दिना निमित्त पाथरी आगाराच्या वतीने मानवत बस स्थानकामध्ये प्रवाशांना पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार करण्यात आआला. ग्रामीण व शहरी भाग असो एसटी महामंडळाची लाल परी ही खेड्या पाड्याची जीवन वाहिनी असून आता अधुनिकतेच्या मार्गावर वेगाने प्रवास करीत आहे. महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या वतीने प्रवाशांना आता एसटी बस मध्ये मोबाईल चार्जिंग, संकटकालीन बाहेर पडण्यासाठी व शुद्ध हवा आत येण्यासाठी मोठ्या स्वरूपाच्या खिडक्या, माता भगिनींना व लाडक्या बहिणींना आरक्षण सुविधा बरोबर पन्नास टक्के तिकिटात सवलत देऊन एक प्रकारे महिलांचा सन्मान करण्यात येत आहेदिव्यांगाना आरक्षित जागेची व्यवस्था, माजी सैनिक व पत्रकारांनाही बसण्याची आरक्षण सुविधा उपलब्ध करून दिली आहे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना 50% तर 75 वर्ष वरील वयोवृद्धांना मोफत प्रवासाची सुविधा महाराष्ट्र परिवहन महामंडळ यांनी उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे नागरिकांचा वयोवृद्धांचा व महिलांचा प्रवास सुखकर झाला आहे. याच बरोबर इयत्ता बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलींना मोफत प्रवासाची सुविधा ही उपलब्ध करून दिली आहे दर वर्षी एक जून रोजी महाराष्ट्र परिवहन मंडळाचा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो या वर्षी एस टी चा 77 वा वर्धापन दिन मानवत बस स्थानकामध्ये उत्सहात साजरा करण्यात आला. पाथरी आगाराच्या वतीने प्रवाशांना व महिलांना महाविद्यालयीन मुलींना पुष्पगुच्छ व मिठाईचे वाटप करून उत्सवाच्या वातावरणात वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी पाथरी आगाराचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री. धोंडीराम जाधव, मानवत बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक श्री. माणिकराव तेलभरे, मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य सूरज काकडे, पोलीस पाटील भारत खरात प्रल्हादराव सुरवसे, सर्जेराव कळसकर, सफाई कामगार राजु ढालकरी, तसेच ग्राहक तीर्थ स्व.बिंदू माधव जोशी प्रणित महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष व भारतीय जनता पार्टी रेल्वे प्रवासी प्रकोष्ठचे परभणी जिल्हा सहसंयोजक के. डी. वर्मा माजी जेष्ठ पत्रकार व प्रा. भगवान टेकाळे महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे मानवत तालुका अध्यक्ष एडवोकेट गजानन शिंदे, तसेच प्रवासी महिला प्रवासी महाविद्यालयीन विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
