ताज्या बातम्यापुसदयवतमाळसामाजिक

शेंबाळपिंपरी ते ईसापुर (LR-२९) रोड चे सध्या स्थितीमध्ये थांबलेले काम तत्काळ चालू करून चांगल्या दर्जाचे करा – अशी मागणी वंचित बहुजन आघाडी व गावकऱ्यांनी केली आहे.

✍️ समाधान कांबळे (श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी)

(अनेक वेळा अनेक वृत्तपत्रात बातमी प्रकाशित होऊन सुद्धा या गावाकडे मुद्दामून दुर्लक्ष करण्यात आले आहे.)

पुसद:- (दिनांक 6 एप्रिल) तालुक्यातील मौजे ईसापुर धरण या गावचा रस्ता अत्यंत खराब झाला असून पैदल सुद्धा चालता येत नाही अशी अवस्था इसापूर वाशीयांची झाली आहे मनून वंचित बहुजन आधाडी पुसद व गावकरी मंडळी इसापूर माननीय मौहदय स.न.वि. वो मागील काही वर्षांत शेम्बाळपिंपरी ते इसापुर धरण हा रस्त्या अत्यंत खराब झाला असल्यामुळे आम्ही वेळो वेळी मागनी करून तो रस्ता तब्बल 5 वर्षा नंतर मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत एकुन रस्त्या पैकी लांबी 3:00 कि.मी चा रस्ता मंजुर झाला आहे.

सदर रस्त्याचे भुमीपुजन मा. आ. श्री इंद्रनील मनोहर नाईक (मंत्री साहेब) यांच्या हस्ते 17/02/24 रोजी संपन्न होउन प्रत्यक्ष कामाला सुरवात निवडनुकी अगोदर झाली. (निवडनुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिल्या नंतर) या रस्त्याने इसापुर, सुकळी, गोपवाडी, डोंगरगाव व बुटी तसेच कळमनुरी कडे जाणारा शॉटकट असल्याने नेहमीच वर्दळ असते. राज्य महामार्गास जोडणाऱ्या या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील 6 महिण्या पासुन मधेच गिट्टी, मुरुम चे ढिगारे असल्यामुळे प्रवास करणे धोकादायक झाले आहे.

या रस्त्याचा उपयोग करून पुढे इसापूर धरण पाहण्यासाठी सुद्धा बऱ्याच पर्यटकांची ये जा असते, परंतु या रस्त्यामुळे पर्यटकांचे हाल होतात.

रोज कित्येक खाजगी वाहनांचा अपघात होतो, रस्त्याची दुरवस्था एवढी झाली की आज महामंडळच्या बस सुद्धा येण्यासाठी टाळाटाळ करत आहे. पुसद तालुक्यातिल मुक्कामी बस या कारणामुळे रद्द करण्यात आली आहे. रोज शाळेत जाणान्या वि‌द्यार्थी आणि पालकांना तारेवरची कसरतच करावी लागत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

बांधकाम विभागाने या रस्त्याकडे तातडीने लक्ष देत सदर रस्ता दि 20/4/2025 पर्यंत विषर्यामधील मागणी नुसार कामाला सुरवाल नाही झाल्यास गावकरी व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी दि 21/04/2025 तारखेपासून अमरन उपोषनाला इसापूर गावामधे बसण्याचा इशारा दिला आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!