उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

पाण्याला बांध घातला तर पाणी संथ होतो आणि मनाला बांध घातला तर माणूस संत होतो – अब्दुल मुजीब देवणीकर

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड :- (दिनांक 20 एप्रिल) पाणी आणि मन यांच्यातील साम्य काय ? पाण्याला बांध घातला तर पाणी संथ होतो आणि मनाला बांध घातला तर माणूस संत होतो .

असे विचार अब्दुल मुखी मुजीब देवणीकर उदगीर यांनी मांडले ते जमा अत ए इस्लामी हिंद तर्फे अनंतराव देवसरकर सभागृहात घेण्यात आलेल्या सदभावना ईद मिलन कार्यक्रमात बोलत होते .ते पुढे म्हणाले की आज आपल्या देशात मनाला बांध घालण्याची फार आवश्यकता आहे ,कारण मने फार भरकटली आहेत .

अपेक्षा ,आकांक्षा , वासना ,अनाठाई इच्छा ,दुसऱ्यांचा द्वेष हे सर्व आपल्या मनामध्ये वसत आहे .त्याला बांध घालणं गरजेचे आहे . हे बांध घालण्याचे कार्य वर्षातून एकदा मुस्लिम बांधव रमजानच्या महिन्यामध्ये रोज ठेवून करतात .

ते पुढे म्हणाले की ,रमजानचा महिना ज्यात कुरआनचे अवतरण झाले . जे सकल मानव जातीच्या कल्याणाकरिता संदेश – मार्गदर्शन -जीवन जगण्याची व्यवस्था आहे . कुरआनच्या अवतरणाची सुरवात रमजान च्या महिन्यात झाली . म्हणून रमजानला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले .कुरआनचा केंद्रबिंदू मानव आहे .

मानवी जीवनाशी संबंधित साऱ्या लौकिक व पारलौकिक जीवनाच्या समस्यांचे सविस्तर वर्णन करणारा हा ग्रंथ आहे . मुहम्मद पैगंबर हे कुरआनचे लेखक आहे असा गैरसमज आहे .या ग्रंथाचा लेखक सृष्टी निर्माता आहे .कुरआनचे वैशिष्ट्य विशद करत मुजीब पुढे म्हणाले की ,कुरआन जगात एकमेव अंतीम सुरक्षित ग्रंथ, सर्वात जास्त पठण केल्या जाणारा , विश्वात एकमेव मुखोदत ग्रंथ तसेच आव्हान करणारा ग्रंथ असल्याचे ते म्हणाले .

सर्व मानव एकाच जोडण्याची संतान आहे , सर्वांच आपसात रक्ताच नात आहे .विश्वबंधुत्वाची संकल्पना , या सृष्टीचा ईश्वर निर्माता एक आहे , जीवन जगण्याचा मार्ग प्रात्यक्षिक स्वरूपात दाखवण्यासाठी त्याने संदेश वाहक पाठवले,मृत्यू अटळ आहे . हे जीवन परीक्षा आहे .

प्रत्येकाला आपल्या कर्माचा जाब द्यावा लागेल ह्या कुरआनच्या चार श्रद्धा असल्याचेही मुजीब यांनी स्पष्ट केले .भाषणादरम्यान त्यांनी अस्सलामू अलैकुम व अजानचा अर्थही लोकांना समजावून सांगितला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक काझी जाहिरोदिन यांनी , आभार प्रदर्शन रिजवान खान यांनी तर सूत्रसंचालन फिरोज अन्सारी यांनी केले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!