उमरखेडउमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसन्मान सत्कारसामाजिक

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदानाचा सेवाभावी उपक्रम!

कोणत्याही बातम्या व जाहिरात साठी महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनल शी संपर्क साधावा.

उमरखेड : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत उमरखेड येथील स्वर्गीय वसंतराव नाईक मूकबधिर विद्यालय तसेच रेणुकाबाई जाधव अंध विद्यालय पोफाळी येथे विद्यार्थ्यांसाठी अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रेमपूर्वक भोजनाचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील गरजू व विशेष विद्यार्थ्यांसोबत आनंद वाटण्याचा हा उपक्रम उत्साहात पार पडला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या, तसेच समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सेवा आणि संवेदनशीलतेची भावना पोहोचविण्याचा संदेश दिला.

यावेळी माजी आमदार उत्तमराव इंगळे, भाजपा शहराध्यक्ष अतुल खंदारे, माजी सभापती दिलीप सुरते अजय बेदरकर गजेंद्र मार्कन्डे युवा मोर्चा अध्यक्ष पवन मेंढे गुलाब सूर्यवंशी गटनेते नप विजय हरडपकर नगरसेवक सुरेंद्र कोडगीरवार सुशांत भराडे डॉ प्रतीक रुडे माऊली मांगूळकर धनंजय माने दिनेश आत्राम गजानन जगताप संतोष पवार विष्णु नरवाडे संतोष लुटे गोपाल उदावंत प्रवीण गादेकर आदित्य शिंदे प्रसाद पत्रे रोहित चिकणे विशाल कदम व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, विद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी व उपस्थित नागरिक यांनी मोलाचे सहकार्य केले. उपस्थित सर्वांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button