भीम जयंती निमित्त शहरात मोटरसायकल अभिवादन रॅली यशस्वीरित्या संपन्न
✍️ बबलू भालेराव (मुख्य संपादक) ✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक १५ एप्रिल) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहरातील भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न, महामानव, बोधिसत्व,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी भव्यदिव्य मोटरसायकल अभिवादन रॅली उत्साहात काढण्यात आली होती.

सदर रॅली ही भिम टायगर सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शामभाऊ धुळे आणि सिद्धार्थ दिवेकर शहराध्यक्ष भिम टायगर सेना यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आयोजित करण्यात आली होती.


सदर मोटरसायकल रॅली ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून सुरू होऊन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून खडकपुरा मार्गे हुतात्मा चौक अबरार चौक, सोनार लाईन, चौभारा,मोलाली चौक, ताजपुरा

सदर मोटरसायकल अभिवादन रॅलीचे स्वागत डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथे भीम जयंती उत्सव समिती व रमामाता महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व पंचशील शाल देऊन सत्कार करण्यात आला.

नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधून सदर रॅली नागचोक ते बस स्टॉप समोरून माहेश्वरी चौक पुसद रोडवरील बिरसा मुंडा चौक येथून जुनी तहसील, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाजवळील मोकळ्या जागेतील पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून महागाव रोड वरील वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ संपन्न करण्यात आली.


ही रॅली यशस्वी करण्याकरिता आयोजक शामभाऊ धुळे, सिद्धार्थ दिवेकर, कुमार केंद्रेकर, प्रफुल दिवेकर, कैलास कदम, दीपक कांबळे, बबलू भालेराव, देवानंद पाईकराव, विनोद बरडे, अत्तादीप धुळे,सचिन वाहुळे, सचिन खंदारे, शुद्धोधन दिवेकर, बुद्धभूषण इंगोले, योगेश दिवेकर,आकाश श्रवले, संदीप विनकरे, अंकुश दिवेकर, लखन श्रवले यांच्यासह उमरखेड शहर नव्हे तर तालुक्यातील अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
