वाशीम तहसील कार्यालयात भ्रष्टाचार परस्पर आदेश काढल्याची तक्रार
(तहसीलदाराची बदली करा; अन्यथा उपोषण-रूखमाबाई जमधाडे)

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466
वाशीम :- येथील तहसीलदार निलेश पळसकर यांनी कोणतीही सुचना न देता नोटीस न पाठविता परस्पर आदेश काढल्याची तक्रार रूखमाबाई जमधाडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

शिवाय आदेश काढण्याकरिता लाखो रूपयाची देवाण घेवाण केल्याचाही आरोप केला आहे.निवेदनानुसार उकळी पेन येथील रूखमाबाई जमधाडे यांनी दि. १७ डिसेबर १९९५ रोजी नोंदणीकृत खरेदी खताद्वारे तुकाराम नारायण माने यांच्याकडून गट क्रमांक २९४ मधील जमीन विकत घेतली. त्यानुसार दि. ११ एप्रिल १९८६ रोजी फेरफार नोंदही घेण्यात आली.

गट क्रमांक २९४ मधील एक हेक्टर ८६ आर जमीन होती. १५ एप्रिल १९९३ रोजी ८२ आर जमीन नोंदणीकृतखरेदी खताद्वारे गौतम रामजी इंगोले यांना विकली. उर्वरित शिल्लक ७४ आर जमीन माझ्या मालकीची असून माझ्या ताब्यात आहे. मात्र, असे असतांना रामकिसन राजाराम माने यांनी खोट्या तथ्याच्या आधारे चुक दुरूस्तीचा अर्ज केला.
मला व गौतम इंगोलेला हजर राहून बाजू मांडण्याकरिता सांगण्यात आले. बाजू लेखी स्वरूपात मांडूण सुध्दा ४ मार्च २०२५ रोजी प्रकरण बंद करण्यात आले.

प्रकरणाबाबत वकीलामार्फत विचारणा केली असता सूचना न करता परस्पर आदेश पारित करण्याची खोटी तारीख नमूद करून खोटा आदेश काढला. त्यामुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या तहसीलदाराची गडचिरोली येथे बदली करावी खोटा आदेश रद्द करून ७/१२ कायम ठेवावा, अन् संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी रूखमाबाई जमधाडे यांनी केली आहे.
