ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतशैक्षणिक

मानवत येथील सौ रामकंवर द्वारकादास लड्डा विद्यालयात नवागतांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

मानवत / प्रतिनिधी. प्रविण घागरे.

मानवत येथील सौ रामकंवर द्वारकादास लड्डा सेमी इंग्रजी या उपक्रमशील विद्यालयामध्ये प्रवेशो त्सव कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विश्वभूषण इंगोले, प्रमुख उपस्थिती म्हणून शिक्षण सल्लागार श्री. प्रवीण बेले ,पालक प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर काळे, मानवत पोलीस स्टेशनच्या पोलीस श्रीमती शकुंतला चांदीवाले, पर्यवेक्षक श्री. विलास शिंदे हे उपस्थित होते यावेळी नवागत प्रवेशित विद्यार्थ्यांचे भव्य ट्रॅक्टर सजावट करून ढोल ताशा व लेझीम पथकाद्वारे मानवतनगरी मधून रॅली काढण्यात आली

विद्यालयाचे पालक तथा अष्टपैलू व्यक्तिमत्व शेतकरी मित्र श्री. ज्ञानेश्वर काळे यांनी स्व:खर्चातून आपले ट्रॅक्टर विद्यालयासाठी उपलब्ध करून दिले त्यानंतर विद्यालयामध्ये नवागतांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे औक्षण करून सेल्फी पॉइंटवर क्षणचित्रे घेण्यात आली.

तसेच विद्यालयातर्फे नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना विद्यालयातर्फे बक्षीस देऊन प्रोत्साहन देण्यात आले यावेळी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे देखील वाटप करण्यात आले.

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती मनीषा आहेरकर यांनी तर आभार पर्यवेक्षक श्री. विलास शिंदे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बहुमोल सहकार्य केल्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!