21 आदर्श शिक्षकाचा भाऊसाहेब माने आदर्श पुरस्कार देऊन गौरव

✍️बबलु भालेराव (मुख्य संपादक)
✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)
उमरखेड दिनांक 20.डिसेंबर उमरखेडः पंचायत समितीचे पहीले सभापती दिवंगत आमदार लोकनेते भाऊसाहेब माने हे हाडामासाचे शिक्षक होते. त्यांनी उमरखेड तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रात उत्तुंग कार्य केल्यामुळे सन २०२० मध्ये माजी सभापती प्रजानंद खडसे यांनी पंचायत समिती उमरखेड मधील उत्कृष्ठ व उल्लेखनीय कार्य आणि उपक्रमशील शिक्षकांनां भाऊसाहेब माने आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावा या उदात्त हेतुने सुरु केला होता.

त्यामुळे आज रोजी पंचायत समिती सभागृहात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण कोळपे यांच्या अध्यक्षतेखाली २१ आदर्श शिक्षकानां, शिक्षिकांना भाऊसाहेब माने आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंचायत समिती उमरखेड चेपंचायत समिती शिक्षण विभागाकडून पुरस्काराचे आयोजनशालीग्राम उबाळे तरोडा, सचिन डुब्बेवार तरोडा, भुजगा इनकर सुकळी, अशोक वंजारे कोरटा, प्रकाश मोहकर बुरकुलवाडी, सतिश बन्सोडे बिटरगांव,
नितिन उघडे थेरडी, नथ्थु पुंडे तिवरंग, वैशाली कुलथे बेलखेड, मनोज कटकमवार चालगणी, गोविंद फड बिंटरगाव, गुलाबराव देशमुख पिरंजी, विशाल रनमले चिखली, कैलास चव्हाण गांजेंगांव, देवका चव्हाण घमापूर, अमरीन बेगम मुखीद अहमद ढाणकी, संतोष घुगे चिखली, अरुण बुरकुले सुकळी, अविनाश नरवाडे एकंबा, बालाजी कदम नागापूर, गजानन जाधव गट संसाधन केंद्र, उमरखेड या २१ जणांचा सत्कार करण्यात आला.

कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी सतिश दर्शनवाड, भाऊसाहेब माने जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव माने, भाऊराव चव्हाण, केद्रप्रमुख अनिल बोपीनवार वार, रामदास केन्द्रे, संतोष घुगे, बिबरवाड, पेंढारकर,निलपवार, कर्णेवाड, प्रविण सुर्यवंशी, विजय मुंगे, सर्व केंद्रप्रमुख विचार पिठावर होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण सूर्यवंशी यांनी संचलन गजानन देवकते यांनी तर आभार सुरेश वाघ यांनी केले.
