ताज्या बातम्यापरभणीमानवतशहरसामाजिक

ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेत शिवजन्मोत्सव सोहळा उत्सहात साजरा

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे ( मानवत/प्रतिनिधी) मो. 8308755238

मानवत:- (दिनांक २० फेब्रुवारी)तालुक्यातील मौ. ताडबोगाव जिल्हा परिषद शाळेत १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव सोहळा उत्सहात साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. उमरखान पठाण होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गावचे प्रथम नागरिक तथा ग्रामपंचायतचे सरपंच माऊली काजळे, पत्रकार अलीम खान पठाण, यकीनखान पठाण यांची उपस्थिती होती.

यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली शाळेतीन मुलींनी शिवाजी महाराजांचा पाळणा सादर करून शिवजन्मोत्सव साजरा केला. तसेच विद्यार्थ्यांची भाषणे झाली शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला.

कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अनिल सावळे, जुनेद खान, श्री. दत्ता जोजारे, श्री. बलभीम माथेले जुनेद अन्सारी, शेख आदिल, सय्यद माजीद, श्रीमती नंदा शिंदे, श्रीमती. विशाखा प्रधान, श्रीमती. सारिका करंडे, श्रीमती. स्वाती कुकडे, शेख कौसर इत्यादी शाळेतील शिक्षक उपस्थिती होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीतील विद्यार्थीनी कु. कार्तिकी जंगले व कु. कल्याणी गुंगाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. बलभीम माथेले यांनी केले यावेळी कार्यक्रमास गावातील प्रतिष्टीत नागरिक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!