ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतसामाजिक

बँकेचा कार्यालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शहरातील बँक शाखा व्यवस्थापक यांच्या कडे मागणी


मानवत / प्रतिनिधी, प्रविण घागरे.


मानवत (दिनांक 3 एप्रिल) बँकेचा कार्यालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वतीने शहरातील शाखा व्यवस्थापक यांच्या कडे करण्यात आली आहे. गुढीपाडवा मेळाव्यात राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्वच बँकांमध्ये मराठी वापराबाबत आदेश दिला असून त्या अनुषंगाने आपल्या शाखेतील जवळपास ९९% खातेदार हे मराठी असून त्यांना मराठी भाषा समजते आपल्या शाखेत बाहेरील राज्यातील कर्मचारी हे अ मराठी भाषा वापरत असल्यामुळे वयोवृध्द नागरीक, महिला व शाळा कॉलेज मधील मुलांना अडचणींना सामोरे जावे लागते आहे त्यामुळे आपल्या शाखेतील सर्व फलक हे अ मराठी भाषेमध्ये असल्यामुळे नागरीकांची मोठी गैरसोय असून मराठी भाषेत सर्व फलक लावावे मराठी भाषेचा वापर करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली असून येत्या आठ (८) दिवसाच्या आत आपल्या शाखेतील सर्व कर्मचारी यांना ग्राहकांशी संवाद करतांना मराठी भाषा वापरावी असे सुचवावे व आपल्या शाखेतील सर्व फलक / बॅनर हे मराठीच लावावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेस सदर कृती मनसे स्टाईलने करावी लागेल याची नोंद घ्यावी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्व जबाबदारी संबंधित प्रशासना वर राहील असा इशारा ही निवेदना द्वारे देण्यात आला असून दिलेल्या निवेदनावर माऊली दहे, महादेव काकडे, संतोष कुऱ्हाडे, बालाजी पौळ, दत्तराव शिंदे, गणेश लाडाने, आदित्य आवचार यांच्या सह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!