शिवसेनेच्या संघर्षकन्या हर्षदाताई संजय सिरसाठ यांच्या वाढदिवसानिमित्त किनवट येथे विविध उपक्रमाचे आयोजन
किनवट
✍️ बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

किनवट :- शिवसेना शिंदे गटाच्या संघर्ष कन्या हर्षदाताई संजय शिरसाट यांचा वाढदिवस किनवट शहरात उत्साहात साजरा करण्यात येणार असून या निमित्त संथागार वृद्धाश्रमात अन्नदान तर ग्रामीण रुग्णालयात फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे .

या कार्यक्रमास शिवसेना शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाप्रमुखअजय कदम पाटील वविधानसभा प्रमुख दयाभाऊ पाटील यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री नामदार संजय शिरसाठ यांची सुकन्या तथा शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या हर्षदा संजय शिरसाट यांचा दि.2 मार्च 2025 रोजी वाढदिवस असून किनवट तालुका शिवसेना शिंदे गटाच्या वतीने संघर्षकन्या हर्षदाताई शिरसाट यांचा वाढदिवस 2 मार्च रोजी किनवट शहरात विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यानिमित्त संथागार वृद्धाश्रमात अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तर गोकुंदा येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमासाठी शिवसेना शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी सर्व आघाड्याचे प्रमुख तसेच कार्यकर्त्यांनी 2 मार्च रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विधानसभा प्रमुख दयाभाऊ पाटील व तालुकाप्रमुख अजय पाटील कदम यांनी केले आहे.
