वझुर बु. जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेह संमेलन उत्सहात
[विदयार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्य सादर करत प्रेक्षकांची जिंकली मने]

मानवत / प्रतिनिधी, प्रविण घागरे.
मानवत तालुक्यातील वझुर (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेत १२ मार्च रोजी वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्सहात व थाटात पार पडले विद्यार्थ्यांच्या सुप्त कला, गुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेह सम्मेलन हे बालकांसाठी खूप महत्वाचे व्यासपीठ असते या सम्मेलनात विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र व देशाच्या विविध सांस्कृतिक कला प्रकारातील विविध गीतांवर आपल्या बहारदार नृत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
यामध्ये दांडिया नृत्य, लावणी, पोतराज गीत, शेतकरी गीत, देश भक्तीपर गीत, छत्रपती शिवराय तसेच महमानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील गीत, मैत्री गीत तसेच इत्यादी सामाजिक प्रबोधनात्मक गीतांचे उत्कृष्ट सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांनी सुद्धा तितकाच प्रतिसाद देऊन बालकलाकारांचे कौतुक केले.

सदरील कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शिवराज चव्हाण, उपाध्यक्ष श्री. सिद्धेश्वर शिंदे, शिक्षण तज्ञ श्री. रंजित चव्हाण, सदस्य, श्री. राहुल वाव्हळे, अविनाश वाघमारे, माणिक बलांडे, नवनाथ वाघमारे, मा. अध्यक्ष श्री. रामेश्वर चव्हाण, उपाध्यक्ष श्री. मारोती तुपसमुंद्रे, उपसरपंच श्री. मनोज चव्हाण, ग्रा. पं. सदस्य श्री. अंगद चव्हाण, ज्ञानोबा चव्हाण, सौ. सरस्वती,

विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र कांबळे, शिक्षक श्री. इंगोले सर, पालक, ग्रामस्थ व परिसरातील सर्व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते स्नेह संमेलनासाठी पूर्वनियोजन करून यशस्वी
व प्रभावी कार्यक्रम करण्यासाठी मुख्याध्यापक श्री. झेलाजी काळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. विजय वाघ, नैपथ्य व वेशभूषा करण्यासाठी श्री. नागनाथ बोधने व श्री. अल्ताफ शेख यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली.
