पोलीस स्टेशन उमरखेड परीसरात (तलवार, चाकु) बाळगणाऱ्या तिघांना घेतले ताब्यात.
[डिटेक्शन बँच (DB) उमरखेड यांची कारवाई]
✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड पोलीस अधिक्षक सा. याच्या अवैध तलवार व चाकु विरुध्द कारवाई करणे संबंधाने दिलेल्या निर्देशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड सा.व पोनि शंकर पांचाळ, यांच्या मार्गदर्शनात दि.08/03/2025 रोजी सपोनि पांडुरंग शिदे डिटेक्शन बेंच प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे सोबत पो शि 1652 संघशिल टेंभरे डी. बी.पथक यांनी गुन्हेगारी शोध अवैध धंदे कारवाई पाहीजे असलेले आरोपी अवैध शस्त्र शोध घेणे,

उमरखेड हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना मुखवीरद्वारे माहिती मिळाली की, तिन इसम उमरखेड शहरातील राज डिलक्स या हॉटेल व लॉज येथे तीन इसम हे अवैध तलवार व चाकु बाळगुण आहे.अशी गोपनीय माहिती मिळाल्याने उमरखेड शहरातील राज डिलक्स या हॉटेल व लॉज येथे पंचासह गेलो असता तेथील हॉटेल मालक पत्तेवार यांना सदर बाब सांगुन यवतमाळ येथील ईसम कोणत्या रुममध्ये आहे,

असे विचारले असता त्यांनी सांगोतले को रुम नं. 110 मध्ये आहे आम्ही पोलीस स्टाफ व पंच रुम नं.110 कडे गोलो असता रुम मध्ये तिन ईसम दिसुन आल्याने आम्ही आमची व पंचाची ओळख देउन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख अहेफज शेख फिरोज, वय 19 वर्ष, व्या. मजुरी, 2. बिलाल खान सलीम खान, वय 18 वर्ष, व्या-मजुरी दोन्ही रा. अशोक नगर, यवतमाळ ता. जि.यवतमाळसैयद मुदसिर सैयद मजिद वय 18 वर्ष, रा. झाकीर हुसेनवार्ड उमरखेड, जि. यवतमाळ असे सांगितले वरुन त्यास Hal अंगझडती घ्यायची आहे.

त्याने तसा होकार दिल्याने आरोपी क्र.1) शेख अहेफज शेख फिरोज याचे अंगझडती मध्ये एक धारदार बटन चाकु ज्याची एकूण लांबी पात्याची लांबी मुठीची लांबी पात्याची रुंदी कि अं 100/- रुपये त्याचे नंतर 2) बीलाल खान सलीम खान, याचे अंगझडती मध्ये एक स्टोलची तलवार ज्याची एकुण लांबी 82 सेमी, पात्याची लांबी 62 सेमी, मुठीची लांबी 20 सेमी व पात्याची रुंदी 3 सेमी व मुठीची गोलाई 10 सेमी स्टील सारखी कि अं 600/- रुपये चा तसेच मुद्देमाल, 3) सैयद मुदसिर सैयद मजिद याचे बंगची झडती घेतली असता त्यामध्ये एक गुप्ती (चाकु) ज्याची एकुण लांबी 29 सेमी पात्याची लांबी 16 सेमी मुठीची लांबी 13 सेमी कि अं 100 रुपयेचा मुद्देमाल अवैधरित्या व विनापरवाना मिळून आल्याने नमुद पंचासमक्ष मोक्यावर जप्त करण्यात आले.

यांचे विरुध्द शस्त्र अधिनीयम 1959 कलम 4/25 सह कलम 223 भा.न्या.स. अन्वये अप क्र. 143/2025 प्रमाणे पोलीस स्टेशन उमरखेड येथे गुन्हा नोंदी सह कार्यवाही करण्यात आली आहे. पोलीस स्टेशन उमरखेड जिल्हा हि अवैध धंदे शस्त्रे बाळगणारे प्रतिबंध असुन यापुढे यासंबंधी माहीती असल्यास सदरची माहीती जनतेने पोलीसाची कोणतीही भीती मनात न बाळगता पुरवावी व पोलीसांना सह कार्य करावे ही विनंती.

सदर कारवाई यवतमाळ पोलीस अधिक्षक कुमार चिता साहेब, मा. अप्पर अधिक्षक पियुष जगताप साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड सा., पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि पांडुरंग शिदे पो.स्टे. उमरखेड डी बी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे, पोहेको 2020 संदिप ठाकुर पोशि/1652 संघशिल टेभरे चालक पोशि/964 आकाश पवार पो.स्टे. उमरखेड यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. पुढील तपास पोहेको 2020 संदिप ठाकुर करीत आहेत.
