उमरखेडकृषी धनमहाराष्ट्र

उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील शेतकऱ्याचा ६ एक्कर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक

(नुकसान भरपाई देण्याची पीडित शेतकऱ्याची मागणी)

✍🏻 बबलु भालेराव मुख्य संपादक

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड (दिनांक 18 डिसेंबर) तालुक्यातील पोफाळी शिवारातील शेतातील उभ्या ऊसाला वीज वितरण कंपनीच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना दिनांक ११ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता घडली.

नत्था देवजी बरडे असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव असुन त्यांचा शेत सर्व्हे नंबर ४४/१ मध्ये ६ एकर क्षेत्रात उभा असलेला अंदाजे ३०० टन ऊस जळून खाक झाला आहे.

यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे अकरा लाख दहा हजाराचे नुकसान झाले आहे. शेतातून जाणाऱ्या विद्युत विभागाच्या तारांमुळे शॉर्टसर्किट झाले होते.यामुळे ऊसाने भर दिवसा पेट घेतल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.

विद्युत विभागाच्या गलथन कारभारामुळे ही घटना घडली असून शेतकरी नत्था देवजी बरडे यांनी पोफाळी पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार सुद्धा दिली आहे.शेतकऱ्याने नुकसान भरपाई देण्याची मागणी सुद्धा यावेळी केली आहे.

शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत देऊन दिलासा देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!